SUV craze : भारतीयांचे वाढते SUV प्रेम ...कंपन्यांनी पाच वर्षांत लॉंच केली 36 मॉडेल्स

SUV Market : भारतातील ग्राहकांची एसयूव्ही (SUV) वाहने खरेदी करण्याची क्रेझ सातत्याने वाढत आहे. यामुळेच कदाचित गेल्या पाच वर्षांत 36 SUV मॉडेल भारतीय ऑटोमोबाइल (Automobile) बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहेत. SUV ची 'क्रेझ' इतकी आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स विकत घेण्यासाठी लोकांना दोन वर्षे वाट पहावी लागते, परंतु त्यानंतरही ऑर्डरचा वर्षाव होतो आहे. कार खरेदीदार वाहनांवर अधिक खर्च करण्यास तयार आहेत.

SUV craze in India
भारतीय ग्राहकांचे एसयूव्ही प्रेम 
थोडं पण कामाचं
  • भारतीय बाजारपेठेत सध्या एसयूव्ही श्रेणीतील वाहनांचा दबदबा
  • मागील पाच वर्षात ऑटोमोबाइल कंपन्यांनी बाजारात लॉंच केल्या अनेक एसयूव्ही
  • एंट्री-लेव्हल एसयूव्ही श्रेणीचा भारतीय बाजारपेठेत मोठा वाटा

SUV craze in India : नवी दिल्ली : भारतातील ग्राहकांची एसयूव्ही (SUV) वाहने खरेदी करण्याची क्रेझ सातत्याने वाढत आहे. यामुळेच कदाचित गेल्या पाच वर्षांत 36 SUV मॉडेल भारतीय ऑटोमोबाइल (Automobile) बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहेत. SUV ची 'क्रेझ' इतकी आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स विकत घेण्यासाठी लोकांना दोन वर्षे वाट पहावी लागते, परंतु त्यानंतरही ऑर्डरचा वर्षाव होतो आहे. कार खरेदीदार वाहनांवर अधिक खर्च करण्यास तयार आहेत. भारतीय ग्राहक सनरूफ आणि नवीन तंत्रज्ञानासारखी वैशिष्ट्ये असलेल्या वाहनांच्या टॉप मॉडेलला प्राधान्य देत आहेत. (In Indian automobile market SUV craze is rising)

अधिक वाचा : Electric Car : इलेक्ट्रिक कार विकत घेण्याच्या विचारात आहात का? मग जरा थांबा, येतायेत अनेक नवीन कार

एसयूव्ही अधिकाधिक लोकप्रिय होत आहे (SUV Popularity)

भारतातील ज्या बाजारात हॅचबॅकची विक्री सर्वात जास्त असायची, तिथे आता एंट्री-लेव्हल आणि मिड-साईज स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (SUV) अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यामुळेच या श्रेणीतील नवीन मॉडेल बाजारात आणले जात आहेत. 

SUV चा वाटा 40 टक्के

शशांक श्रीवास्तव, वरिष्ठ कार्यकारी संचालक (विक्री विपणन), मारुती सुझुकी इंडिया म्हणाले की, “एसयूव्ही श्रेणीमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. उद्योगातील SUV श्रेणीचे योगदान, जे पूर्वी सुमारे 19 टक्के होते, ते 2021-22 मध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि ते आणखी वाढते आहे.

अधिक वाचा : Traffic Challan: सावध रहा! या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा मार्ग न दिल्यास कापले जाणार 10,000 रुपयांचे चलान...

प्रीमियम हॅचबॅकला मागे टाकले

मागणी वाढल्याने, एंट्री-लेव्हल एसयूव्ही श्रेणीने गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत सर्वात मोठा वाटा उचलला आणि 2011 पासून बाजारपेठेत राज्य करत असलेल्या प्रीमियम हॅचबॅकला मागे टाकले.

कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराची एसयूव्ही

गेल्या वर्षी 30.68 लाख वाहनांपैकी 6.52 लाख एंट्री लेव्हल एसयूव्ही होत्या. आश्चर्याची गोष्ट नाही की, गेल्या पाच वर्षांत, प्रवासी वाहन श्रेणीतील बहुतेक मॉडेल्स कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही होत्या.

अधिक वाचा : Electric Bike : हिरो स्प्लेंडरसारखी इलेक्ट्रिक मोटरसायकल आली बाजारात, एका चार्जवर धावणार 140 किमीचे अंतर

अलीकडच्या काळात भारतीय वाहन उद्योगाने झपाट्याने मोठे बदल होत आहेत. देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicles) दबदबा वाढत चालला आहे. त्यामुळेच सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. ऑटोमोबाइल कंपन्यांच्या  (Automobile) म्हणण्यानुसार, भारतातील त्यांच्या एकूण विक्रीमध्ये इलेक्ट्रिक कारचा(Electric car) वाटा आगामी काळात जवळपास 25 टक्के असेल. टाटा मोटर्स (Tata Motors)सध्या जवळपास 80 टक्के मार्केट शेअरसह इलेक्ट्रिक कार विभागात वर्चस्व गाजवत आहे. मात्र आगामी काळात गोष्टी बदलतील कारण महिंद्रा आणि ह्युंदाई इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये नवीन वाहने सादर करण्याचा विचार करत आहेत. देशातील अनेक आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपन्यांनीदेखील इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मागील एका दशकात भारतीय वाहन उद्योगाने कात टाकली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी