Tata Tiago NRG iCNG : टाटा मोटर्सनी लॉंच केली भारतातील पहिली टफरोडर आयसीएनजी कार, पाहा जबरदस्त वैशिष्ट्ये

Tata Motors Update : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आणि टाटा समूहातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने एक नवी धमाल कार बाजारात लॉंच केली आहे. टाटांनी Tiago NRG iCNG ही नवी कार बाजारात आणली आहे. ऑफरोडिंग क्षमता आणि एसयूव्ही श्रेणीतील डिझाइन यामुळे याआधीच टाटा टिअ‍ॅगो एनआरजीला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे.

Tiago NRG iCNG
टिअ‍ॅगो एनआरजी आयसीएनजी 
थोडं पण कामाचं
  • टाटा मोटर्सचा नवीन मॉडेल्सचा धडाका
  • टाटा टिअ‍ॅगो एनआरजी आयसीएनजी ही कार लॉंच
  • एसयूव्हीचे डिझाइन आणि नवे तंत्रज्ञान यासह अनेक वैशिष्ट्ये

Tata Tiago NRG iCNG launched :नवी दिल्ली : तुम्हाला जर दणकट आणि एसयूव्ही श्रेणीतील वैशिष्ट्यांसह तुलनेने किफायतशीर किंमतीत जर एखादी कार हवी असेल तर टाटांची टिअ‍ॅगो हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आणि टाटा समूहातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने (Tata Motors) एक नवी धमाल कार बाजारात लॉंच केली आहे. टाटांनी टिअ‍ॅगो एनआरजी ही नवी आयसीएनजी ( Tiago NRG iCNG)कार बाजारात आणली आहे. टाटा मोटर्सची ही नवी iCNG कार ग्राहकांना 4 रंगांमध्ये आणि 2 ट्रिम पर्यायांमध्ये मिळणार आहे. ऑफरोडिंग क्षमता आणि एसयूव्ही श्रेणीतील डिझाइन यामुळे याआधीच टाटा टिअ‍ॅगो एनआरजीला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे.  Tiago NRG ला गेल्या 1 वर्षात मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहून, टाटा मोटर्सने  देशातील सर्वात प्रगत iCNG तंत्रज्ञानासह टिअ‍ॅगो लॉन्च करून आपल्या NRG ताफ्याचा विस्तार केला आहे. (India's first toughroader Tiago NRG iCNG launched by Tata Motors, check details read in Marathi) 

अधिक वाचा -  FIFA Wolrd Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपवरून केरळमध्ये हाणामारी

टाटा मोटर्सची मुसंडी

इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत बाजारपेठ करणारी टाटा मोटर्स दुसऱ्या बाजूला इतर श्रेणीतील वाहनांच्या बाजारपेठेत देखील आपला विस्तार करते आहे. टाटा मोटर्स आपल्या मजबूत आणि टिकाऊ वाहनांसाठी त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. मागील काही तिमाहींमध्ये कंपनीने भारतीय बाजारपेठेत चांगलीच मुसंडी मारली आहे. टाटांची काही नवी वाहने ग्राहकांच्या चांगलीच पंसतीस उतरली आहेत. Tiago NRG iCNG ही भारतातील पहिली टफरोडर आयसीएनजी कार आहे जिचे जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्स 177 मिमी आहे. शिवाय या कारला सुधारित सस्पेंशन सुविधा देण्यात आली आहे.

अधिक वाचा - Hot Water Bath Effects: सावधान! थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळीचे क्षणिक सुख, तुमच्या शरीराचे करते इतके मोठे नुकसान...

नवी टिअ‍ॅगो फॉरेस्टा ग्रीन, फायर रेड, पोलर व्हाइट आणि क्लाउडी ग्रे या चार आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. Tiago NRG iCNG दोन ट्रिम पर्यायांमध्ये मिळणार आहे. ग्राहकांना आजपासूनच ही कार डीलर्सकडे उपलब्ध होणार आहे.

नव्या टिअ‍ॅगो एनआरजीची मॉडेल आणि किंमत

टाटा मोटर्सचे ही नवी कार दोन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. टिअ‍ॅगो एक्सटी एनआरजी आयसीएनजी (Tiago XT NRG iCNG)ची किंमत 7,39,900 रुपये असणार आहे. तर टिअ‍ॅगो एनआरजी आयसीएनजी (Tiago NRG iCNG)ची किंमत 7,79,900 रुपये असणार आहे.

कारचे डिझाइन आणि क्षमता

टिअ‍ॅगो एनआरजी आयसीएनजीचे डिझाइन हे एसयूव्ही श्रेणीतून प्रेरित असून कारमध्ये जबरदस्त ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. नव्या टिअ‍ॅगोच्या लॉंच प्रसंगी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे ​​विक्री, विपणन आणि ग्राहक सेवा, उपाध्यक्ष श्री राजन अंबा म्हणाले की, “Tiago NRG ला सुरूवातीपासूनच ग्राहकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. खासकरून कारचे डिझाइन आणि हाय ग्राउंड क्लीयरन्सचे त्यांना कौतुक वाटत आहे. याच वैशिष्ट्यांमुळे अर्बन टफरोडर म्हणून या कारचे स्थान मजबूत होते. Tiago NRG iCNG ही भारतीय भूप्रदेशासाठी योग्य वाहन असून त्यात जबरदस्त तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांची जोड मिळालेली आहे. 

अधिक वाचा - Suryakumar Yadav: सूर्याला कधी मिळणार कसोटी खेळण्याची संधी? खुद्द क्रिकेटरने दिले याचे उत्तर

टाटा मोटर्सने आयसीएनजी तंत्रज्ञान, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानासह बाजारात आणलेल्या या कारला   ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नव्या आयसीएनजी मॉडेलमध्ये आणखी दमदार फीचर्स देण्यात आली आहेत. यात  आर्मर्ड फ्रंट क्लॅडिंग, इनफिनिटी ब्लॅक रूफ रूफ रेलसह, एक मस्क्युलर टेलगेट, सॅटिन स्किड प्लेट, स्क्वायरल व्हील कमानी आणि 14 इंची हायपरस्टाईल चाके देण्यात आली आहेत. पेट्रोल, आयसीएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा यात समावेश आहे. टिअ‍ॅगोचे हे सर्व व्हेरियंट टाटा मोटर्सच्या ‘न्यू फॉरएव्हर’ श्रेणीचा अविभाज्य भाग आहे. टाटा मोटर्सने 2016 मध्ये लॉन्च केलेल्या Tiago ला बाजारपेठेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. टिअ‍ॅगो श्रेणीतील कार लॉंच केल्यापासून 4.4 लाखांहून अधिक कार विकल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी