जॅग्वार लँड रोव्हरची ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार, सगळ्यात खास आहेत हे फीचर

Jaguar Land Rover's automatic electric car: टाटा मोटर्स कंपनी जॅग्वार लँड रोव्हर्सने एक ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे.

jaguar land rover's automatic electric car is the most special feature
जॅग्वार लँड रोव्हरची ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार, सगळ्यात खास आहेत हे फीचर  |  फोटो सौजन्य: Twitter

कोव्हेंट्री: टाटा मोटर्सची कंपनी जॅग्वार लँड रोव्हर्सने भविष्यातील काही गोष्टींचा विचार करुन ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे. ही कार मध्य ब्रिटनमधील वारविक विद्यापीठात असलेल्या कंपनीच्या इनोव्हेशन सेंटरमध्ये विकसित केली गेली आहे. कंपनीने ही कार 'प्रोजेक्ट वेक्टर' अंतर्गत तयार केले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, प्रोजेक्ट वेक्टर प्रगत, बहुउद्देशीय, स्वयंचलित आणि लवचिक इलेक्ट्रिक कार विकसित करण्याचा प्रकल्प आहे.

जॅग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राल्फ स्पेथ म्हणाले की, 'प्रोजेक्ट वेक्टर हे दर्शविते की, जॅग्वार लँड रोव्हर आपल्या समाजात अधिक सुरक्षित, निरोगी आणि पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी नावीन्य देण्यासाठी अग्रेसर आहे.' पुढे ते म्हणाले की, 'या प्रकल्पातून आम्ही शैक्षणिक, पुरवठा साखळी आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कलागुण एकत्र आणत आहोत. जेणेकरुन वाहतुकीची जोडलेली व्यवस्था आणखी विकसित केली जाईल.' 

कंपनीने ऑटोमोबाईल उद्योगाच्या भविष्याचे नाव 'डेस्टिनेशन झिरो' असे ठेवणार आहे. जिथे अपघात शून्य असतात, उत्सर्जन शून्य आहे आणि रस्त्यावर रहदारीचा दबाव शून्य आहे. 

दरम्यान, कंपनीने या कारबाबत माहिती देताना असं सांगितलं की, या कारची लांबी फक्त चार मीटर आहे. शहरातील गरजा लक्षात ठेवून या कारची रचना केली गेली आहे. यात सर्व बॅटरी आणि ड्राईव्हट्रेन उपकरणे आहेत. जे या कारला ती बहुउद्देशीय बनवते. आतील केबिन देखील अशा प्रकारेच डिझाइन केलेलं आहे की, जे वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरानुसार बदलले जाऊ शकते.

ही कार बाजारात आल्यास यामुळे मोठा बदल घडू शकतो. मागील अनेक वर्ष ड्रायव्हरलेस कारवर संशोधन सुरु आहे. त्यात जर ही इलेक्ट्रॉनिक कार बाजारात आली तर त्यामुळे निसर्गालाही हानी पोहचणार नाही. यामुळे टाटा मोटर्स ही कार कधी बाजारात आणणार याकडेच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी