Keeway bikes prices cut down: कीवे इंडियाने 2022 मध्ये आपल्या K300N आणि K300R या दोन बाईक्सच्या लॉन्च केल्या होत्या. आता कंपनीने या दोन्ही बाईक्सच्या किमतीत कंपनीने मोठी कपात केल्याचं जाहीर केलं आहे. या दोन बाईक्सपैकी K300N या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.65 लाख रुपयांपासून ते 2.85 लाख रुपये इतकी होती. तर K300R या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.99 लाख रुपयांपसून ते 3.20 लाख रुपये यांच्या दरम्यान होती. मात्र, आता कंपनीने या बाईक्सच्या किमतीत कपात केली आहे.
K300N बाईकच्या किमतीत कंपनीने 30,000 रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता ही बाईक 2.55 लाख रुपयांत उपलब्ध होईल. तर दुसऱ्या म्हणजेच K300R बाईकच्या किमतीत कंपनीने तब्बल 55,000 रुपयांनी कपात केली आहे. या कपातीमुळे आता K300R ही बाईक 2.65 लाख रुपयांत उपलब्ध होईल.
हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?
कीवे च्या या दोन्ही बाईक्स एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या असून दोन्ही बाईक्सचं इंजिन सुद्धा एकसारखेच आहे. K300N आणि K300R या दोन्ही बाईक्समध्ये 292.4 सीसीचं लिक्विड कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे जे 27.5 एचपी पावर आणि 25 Nm टॉर्क जनरेट करतं. कंपनीने या बाईकमध्ये 6 स्पीड गेअरबॉक्स दिलं आहे.
हे पण वाचा : गरोदरपणात चिंच खाल्ली तर काय होते?
कीवे इंडियाने दोन्ही बाईक्सच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स दिले आहेत. K300N आणि K300R बाईक्सला ड्युअल चॅनल एबीएस आणि स्लिपर क्लच दिले आहेत. K300N नेकेड डिझाईन असलेली बाईक आहे जी शार्प पॅनल्ससह उपलब्ध आहे. तर K300R ही फुल्ली फेयर्ड बाईक आहे जी क्लिपऑन हँडलबार्ससह आहे. कंपनीने या दोन्ही बाईक्स सफेद, लाल आणि काळ्या अशा तीन रंगांत लॉन्च केल्या आहेत.