Kia Motors चं अॅनिव्हर्सरी एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत

किया मोटर्स इंडियाने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही सेल्टोसचं खास व्हर्जन लाँच केलं आहे. पाहा नेमकं का लाँच केलंय हे व्हर्जन 

Kia_Seltos_Anniversary_Edition
किआ सेल्टोस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • किआ मोटर्सने सेल्टोस कारचं नवं व्हर्जन केलं लाँच
  • नव्या सेल्टोसची किंमत १३.७५ लाखांपासून पुढे
  • पाहा काय आहेत या कारचे फीचर्स

नवी दिल्ली: किआ मोटर्स इंडियाने (Kia Motors) पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या लोकप्रिय एसयूव्ही सेल्टोसचं ( Seltos) विशेष व्हेरिएंट (Verient) बाजारात आणलं आहे. त्याची शोरूम किंमत १३.७५ लाख ते १४.८५ लाख रुपयांदरम्यान आहे. कंपनीने गुरुवारी निवेदनात म्हटले आहे की, सेल्टोसच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी हे नवीन व्हेरिएंट बाजारात आणलं आहे. हे एचटीएक्स ट्रिमवर आधारित आहे जे पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

कंपनीने म्हटले आहे की, यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे. याची मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत १३.७५ लाख रुपये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत १४.७५ लाख रुपये आहे. तर डिझेल इंजिनच्या मॅन्युअल ट्रांसमिशन व्हर्जनची किंमत १४.८५ लाख रुपये आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कूक्ह्यून शिम म्हणाले की, सेल्टोसची सुरूवात 2019 मध्ये झाली होती. यामुळे देशात किआ मोटर्सचा ब्रँड स्थापित होण्यास मदत झाली.

साऊथ कोरियन कंपनी  Kia Motors ने कॉम्पॅक्ट एसयूव्ही Seltosच्या माध्यातून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. ही एसयूव्ही दोन वेगळ्या डिझाइन लाइन (टेक लाइन आणि जीटी लाइन) मध्ये लॉन्च करण्यात आली होती.  एखादे कारचे मॉडेल हे दोन डिझाइनच्या ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेग्मेंटमध्ये हे पहिल्यांदा करण्यात आले आहे. सेफ्टीबाबत बोलायचे तर या कारमध्ये ६ एअरबॅग, एबीएस, ईएससी, हील स्टार्ट असिस्टंट, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर आणि ब्लाइंड स्पॉट व्यू मॉनिटर देण्यात आला आहे. 

या कारमध्ये ३ इंजिन ऑप्शन आहे. कारमध्ये १.५ लीटर,४ सिलेंडर पेट्रोल इंजिन, १.४ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लीटर डीझेल इंजिन आहे. Seltos मार्केटमध्य टाटा हॅरियर, एमजी हेक्टर आणि हुदाई क्रेट सारख्या एसयूव्हीला टक्कर देत आहे. या कारला भारतात ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर करण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी