Best Selling Scooters: हे आहेत देशातील सर्वाधिक विकले जाणारे स्कूटर्स, कमी किंमतीत मिळते 60 किमी प्रति लीटर

अनेक वर्षांपासून लोकांचा स्कूटरवर भरवसा कायम आहे. होंडा अ‍ॅक्टिवा 6 जीच्या सर्व प्रकारांमध्ये अलीकडेच किंमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. होंडा अ‍ॅक्टिवा 6 जी साठी स्टँडर्ड ट्रिम किंमत 67843 रुपयांपासून सुरू होते

 latest news best selling scooters list of indian market with 60kmpl of mileage
Best Selling Scooters: पहा सर्वाधिक विकले जाणारे स्कूटर्स 

थोडं पण कामाचं

  • अनेक वर्षांपासून लोकांचा स्कूटरवर भरवसा कायम आहे.
  • होंडा अ‍ॅक्टिवा 6 जीच्या सर्व प्रकारांमध्ये अलीकडेच किंमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे.
  • होंडा अ‍ॅक्टिवा 6 जी साठी स्टँडर्ड ट्रिम किंमत 67843 रुपयांपासून सुरू होते

नवी दिल्ली,  Best Selling Scooters :  भारतीय दुचाकी बाजारात मोटारसायकली आणि स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन वाहन उद्योग उत्पादक सतत त्यांची नवीन उत्पादने बाजारात आणतात. परंतु आजही असे काही स्कूटर आहेत ज्यांच्यावर लोकांनी बर्‍याच वर्षांपासून आपला विश्वास कायम ठेवला आहे. चला अशा काही स्कूटर्सकडे पाहू:

होंडा अ‍ॅक्टिवा (Honda Activa):

आमच्या यादीतील पहिले नाव होंडा अ‍ॅक्टिवा आहे. अनेक वर्षांपासून लोक या स्कूटरवर लोकांचा भरवसा कायम आहे. होंडा अ‍ॅक्टिवा 6 जीच्या सर्व प्रकारांमध्ये अलीकडेच किंमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. होंडा अ‍ॅक्टिवा 6 जी ची स्टँडर्ड ट्रिम किंमत 67,843 रुपयांपासून सुरू होते. अ‍ॅक्टिव्हाचे बीएस 6 मॉडेल 109.51 सीसीचे सिंगल-सिलेंडर फ्यूल-इंजेक्टेड इंजिनसह सुसज्ज आहे, जे 7.79 पीएसची शक्ती आणि 8.79Nm ची टॉर्क जनरेट करते. होंडाचा असा दावा आहे की नवीन बीएस 6 इंजिन पूर्वीपेक्षा 10 टक्के अधिक मायलेज देते. कंपनीची नवीन अ‍ॅक्टिवा 60 किलोमीटर पर्यंत मायले देण्यात करण्यास सक्षम आहे. 


टीव्हीएस जुपिटर (Tvs Jupiter) :

टीव्हीएस जुपिटर ही अॅक्टीव्हानंतर भारतात सर्वाधिक पसंत केली जाणारी स्कूटर आहे. ज्यात कंपनीने 109,7 सीसी इंजिनचा वापर करते.  जी 7.47PS ची पावर आणि 8.4Nm ची टॉर्क जनरेट करते. टीव्हीएस ज्युपिटर बीएस 6 इंटेलिगो आणि क्लासिकसह पाच प्रकारांच्या शीट मेटल व्हील्स, स्टँडर्ड, झेडएक्स (ड्रम), झेडएक्स डिस्कसह उपलब्ध आहे. त्याची किंमत दिल्लीच्या एक्स-शोरूम 64,437 रुपयांपासून सुरू होते. मायलेजबद्दल बोलल्यास, ही स्कूटर 50 ते 55 केपीपीएल पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी