Mahindra Thar Viral Video : बंगळूरू : नवीन वाहनाची डिलिव्हरी घेताना प्रत्येकजण उत्साहात असतो, पण या उत्साहात कधी कधी आपण मोठी चूक करतो. डिलिव्हरी घेताना गाडीचा अपघात होतो, असे अनेक व्हिडिओ अनेकदा समोर येतात. अशीच एक नुकतीच घटना बंगळुरूमधून (Bengaluru) समोर आली आहे. तिथे डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने त्याची महिंद्रा थार (Mahindra Thar)रस्त्यावर पडण्यापासून वाचवली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होतो आहे. (Mahindra Thar flies out of showroom, video goes viral on social media)
महिंद्रा थार ही तशी लोकप्रिय गाडी आहे. बंगळूरूमधील या घटनेने महिंद्रा थारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका अपघात झाल्यानंतर थारवर ऑफ रोड टेस्टची कॉमेंट्स नेटकऱ्यांनी केली आहे आणि ती व्हायरल होते आहे. व्हायरल चित्रे आणि व्हिडिओंमध्ये शोरूमच्या बाहेर रेलिंगला लटकलेली महिंद्रा थार दिसत आहे. कार अशा अवस्थेत पाहून तेथे गर्दी जमली. हे शोरूम पहिल्या मजल्यावर हजर होते. थारचे पुढचे चाक जमिनीच्या खाली लटकलेले स्पष्टपणे दिसते. तसेच शोरूमच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक टोमणे मारत आहेत की ग्राहकांनी थारची ऑफ-रोड टेस्ट घेतली असेल.
नंतर या एसयूव्हीला जेसीबीच्या साहाय्याने मागे ढकलण्यात आले आणि ती शोरूममध्ये सुखरूप पोहोचल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रेलिंगमुळे गाडी खाली पडणे टाळण्यात यश आल्याचे बोलले जात आहे. मात्र, धडकेने रेलिंगचा काही भाग तुटला. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही.
गेल्या वर्षी टाटा टियागो देखील अशाच एका घटनेत पहिल्या मजल्यावरून पडली होती. वास्तविक, डिलिव्हरी घेण्यासाठी गेलेले ग्राहक त्यांच्या नवीन टियागोमध्ये बसून वैशिष्ट्ये समजून घेत असताना अचानक त्यांच्याकडून कार धावू लागली आणि हा अपघात झाला. यापूर्वी किआ कार्निव्हलमध्येही डिलिव्हरीच्या वेळी नुकसान झाले होते. पहिल्यांदाच ऑटोमॅटिक वाहन चालवताना लोक गोंधळून जातात आणि अपघाताला बळी पडल्याचे अनेकदा दिसून येते.
हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) या भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माती कंपनीने महिंद्रा समूहासोबत (Mahindra Group) पाच वर्षांची धोरणात्मक भागीदारी केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) निर्माता आणि पारंपारिक इंजिन कंपनी यांच्यातील असा पहिला करार आहे. हे पाऊल अशा वेळी आले आहे जेव्हा भारतात ईव्ही विक्रीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. ही भागीदारी इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात जवळपास ३६ टक्के वाटा असलेल्या हिरो इलेक्ट्रिकला २०२२ पर्यंत १० लाख युनिट्सपर्यंत दुप्पट क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करेल आणि परिणामी वाहन विक्रीच्या वेळी महिंद्रा अॅंड महिंद्राला अतिरिक्त महसूल मिळेल.