Mahindra XUV 300 ला ग्राहकांचा मिळतोय तुफान प्रतिसाद, पाहा काय आहे खास

भ्रूममभ्रूमम
Updated May 08, 2019 | 16:49 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Mahindra XUV 300 Booking: महिंद्रा एक्सयूव्ही 300 या गाडीला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. या गाडीने 26 हजार गाड्यांच्या बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. जाणून घ्या या गाडीची किंमत आणि फिचर्स...

Mahindra XUV 300
Mahindra XUV 300 

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच आपली नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही महिंद्र एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300) लॉन्च केली आहे. या गाडीला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. महिंद्रा कंपनीने ही एक्सयूव्ही 300 गाडी 14 फेब्रुवारी 2019 रोजी लॉन्च केली होती. ही गाडीला पहिल्याच महिन्यात 13 हजार बुकिंग मिळाली होती. एप्रिल महिन्यात मारुती सुझुकी विटारा ब्रेझा नंतर सर्वाधिक विक्री झालेली ही दुसरी एसयूव्ही ठरली होती.

महिंद्रा कंपनीने सांगितले आहे की, लॉन्चिंग नंतर अडिच महिन्यांनी महिंद्रा एक्सयूव्ही 300 गाड्यांच्या 26 हजार युनिट्सची बुकिंग आतापर्यंत झाली आहे. तसेच फुल लोडेड म्हणजेच टॉप व्हेरिएंटची सर्वाधिक मागणी आहे, एकूण बुकिंगपैकी 70 टक्के बुकिंग हे टॉप व्हेरिएंटचं असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेल व्हेरेएंटपैकी पेट्रोल व्हेरिएंटची मागणी अधिक असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

फेब्रुवारी - मार्च 2019 महिन्यांमध्ये पेट्रोल व्हेरिएंटच्या 2,744 युनिट्सची विक्री झाली जी एकूण विक्रीपैकी जवळपास 40 टक्के आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 300 चार व्हेरिएंट आणि दोन इंजिन पर्यायांत उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला 117 हॉर्सपावर ताकद असलेलं 1.5 लिटरचं टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आणि 1.2 लिटरचं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

दोन्ही इंजिनसह 6 स्पीड युनिट असलेलं मॅन्युअल गिअरबॉक्स गाडीत देण्यात आलं आहे. या कारचं सध्या ऑटोमेटिक व्हेरिएंट उपलब्ध नाहीये. मात्र, अपेक्षा केली जात आहे की, कारचं डिजेल व्हेरिएंट लवकरच ऑटोमेटिक गिअरबॉक्ससह लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. एक्सयूव्ही 300 मधअये फर्स्ट इन सेगमेंट फिचर सारखे, सात एअरबॅग, फ्रंट पार्किंग सेंसर, हीटेड विंग मिरर, ड्युअल झोन क्लायमेंट कंट्रोल, स्टियरिंग मोड आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या गाडीची सुरुवाती किंमत 7.90 लाख रुपये आहे तर टॉप व्हेरिएंटची किंमत 11.99 लाख रुपये आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mahindra XUV 300 ला ग्राहकांचा मिळतोय तुफान प्रतिसाद, पाहा काय आहे खास Description: Mahindra XUV 300 Booking: महिंद्रा एक्सयूव्ही 300 या गाडीला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. या गाडीने 26 हजार गाड्यांच्या बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. जाणून घ्या या गाडीची किंमत आणि फिचर्स...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola