Maruti Car update : मारुतीच्या वाहनांना प्रचंड मागणी, 3.87 लाख वाहनांची ऑर्डर प्रतिक्षेत

Automobile update : मारुति कारना सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे. कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. व्याजदर वाढीमुळे सध्या वाहनांच्या मागणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु सेमीकंडक्टर टंचाईची समस्या सुटल्यानंतर आणि उत्पादन सामान्य झाल्यावर खरी परिस्थिती स्पष्ट होईल. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki) चे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ग्रँड विटारा (Grand Vitara) आणि ब्रेझा(Brezza) सारख्या नवीन उत्पादनांमुळे, बुकिंग वाढले आहे

Maruti Suzuki Car
मारुति सुझुकीची वाहने 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयने व्याजदर वाढवल्यानंतरदेखील कार विक्रीवर परिणाम नाही
  • 2.8 लाखांवरून कारची ऑर्डर 3.87 लाख युनिटपर्यंत वाढली
  • कंपनीने या वर्षी मे-जुलैमध्ये एकूण क्षमतेच्या 95 टक्के उत्पादन केले

Maruti Car Demand : नवी दिल्ली : मारुति कारना सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे. कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. व्याजदर वाढीमुळे सध्या वाहनांच्या मागणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु सेमीकंडक्टर टंचाईची समस्या सुटल्यानंतर आणि उत्पादन सामान्य झाल्यावर खरी परिस्थिती स्पष्ट होईल. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki) चे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ग्रँड विटारा (Grand Vitara) आणि ब्रेझा(Brezza) सारख्या नवीन उत्पादनांमुळे, बुकिंग वाढले आहे. कंपनीला  ग्राहकांना जी वाहने विकायची आहेत त्यांची संख्या 3.87 लाख युनिटपर्यंत वाढली आहे. मागील तिमाहीत हीच संख्या 2.8 लाख इतकी होती. (Maruti car sales rises, 3.87 lakh orders are pending)

अधिक वाचा : Multibagger stock: हा शेअर 39 पैशांवरून पोचला 80 रुपयांवर, वर्षभरात 1 लाखाचे झाले 2 कोटी रुपये

व्याजदर वाढीचा वाहन विक्रीवर परिणाम नाही

शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की व्याजदर वाढीचा नकारात्मक परिणाम व्हायला हवा... पण सध्या आम्हाला ते जाणवत नाहीये. व्याजदरात वाढ झाल्याने कारच्या मागणीवर परिणाम झाला आहे का, या प्रश्नाला ते उत्तर देत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. मे महिन्यानंतरची ही सलग तिसरी वाढ होती. यामुळे व्याजदर कोविडच्या आधीच्या पातळीवर आला आहे.

सेमीकंडक्टरचा परिणाम

श्रीवास्तव म्हणाले की, व्याजदरात वाढ झाल्याने मागणीवर परिणाम न होण्याचे एक कारण म्हणजे कोविड आणि सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन मागणी पूर्ण होऊ शकली नाही. ते म्हणाले की, तुमच्याकडे भरपूर उत्पादन झाले की, खऱ्या मागणीचा ट्रेंड कळेल. ते म्हणाले की सेमीकंडक्टर पुरवठा लक्षणीयरीत्या सुधारला आहे, तरीही काही अडथळे आहेत, जे कंपनीला तिच्या पूर्ण उत्पादन क्षमतेवर कार्य करण्यास प्रतिबंधित करत आहेत.

अधिक वाचा : काय सांगता? Kolkata मध्ये २० विमानांच्या घिरट्या, ९० मिनिटे प्रवाशांनी रोखला श्वास

उत्पादनात वाढ

श्रीवास्तव म्हणाले की, ते सामान्य स्थितीत कधी येईल हे सांगणे कठीण आहे. चिप्सच्या नेमक्या उपलब्धतेबाबत आमच्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही, असे ते म्हणाले. ते म्हणाले की कंपनीने या वर्षी मे-जुलैमध्ये एकूण क्षमतेच्या 95 टक्के उत्पादन केले. हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 40 टक्के इतके कमी होते.

अधिक वाचा : Ranveer Nude photoshoot case : न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहने जबाब नोंदवण्यासाठी मागितला 2 आठवड्यांचा वेळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मारुतिने अलीकडेच आपली नवी कार बाजारात आणली आहे. मारुती सुझुकीने गुरुवारी नवीन अल्टो के10 लॉन्च (Maruti Suzuki new Alto K10) करण्याची घोषणा केली. नवीन अल्टो नवीन बाह्य, प्रशस्त आतील भाग, चांगला परफॉर्मन्स आणि कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह इतर अनेक वैशिष्ट्यांसह येते. अल्टो K10 नेक्स्ट-जनरल K-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिनसह येते आणि सुझुकीचे प्लॅटफॉर्म, पॉवरट्रेन आणि तंत्रज्ञान वापरून तयार केले गेले आहे. अल्टो ही 22 वर्षांमध्ये सलग 16 वर्षे देशात प्रथम क्रमांकाची विक्री होणारी कार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी