Maruti Celerio | नव्या मारुति सेलेरियोची महत्त्वाची वैशिष्ट्ये, इंजिनची खासियत, किंमत...

New Maruti Celerio : याआधीचे सेलेरियोचे मॉडेल बाजारात यशस्वी ठरले होते. सेलेरियो ही एएमटी गियरबॉक्स असणारी पहिली मारुति कार ठरली आहे. मारुतिने आपल्या नव्या सेलेरियोमध्ये अनेक फीचर्स जोडले आहेत

New Maruti Celerio Launched
नवीन मारुति सेलेरियो बाजारात 
थोडं पण कामाचं
  • मारुति सुझुकीची नवी सेलेरियो बाजारपेठेत
  • सेलेरियो ही एएमटी गियरबॉक्स असणारी पहिली मारुति कार
  • कारचे मायलेज आणि किंमत सर्वाधिक चर्चेचे विषय

New Maruti Celerio Launched in India | नवी दिल्ली :  मारुति सुझुकीने (Maruti Suzuki)भारतीय बाजारपेठेत आपली नवी कार सेलेरियो (new Celerio)आणली आहे. याआधीचे सेलेरियोचे मॉडेल बाजारात यशस्वी ठरले होते. सेलेरियो ही एएमटी गियरबॉक्स असणारी पहिली मारुति कार ठरली आहे. मारुतिने आपल्या नव्या सेलेरियोमध्ये अनेक फीचर्स जोडले आहेत आणि हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या कारचे मायलेज आणि किंमत सर्वाधिक चर्चेचे विषय आहेत. नव्या सेलेरियोच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया. (Maruti Celerio : Maruti Suzuki launched new Celerio in Indian Markets, check the top features)

एक्सटेरियर

नवी सेलेरियो, लेटेस्ट हरटेक्स प्लॅटफॉर्मच्या अनुरुप तयार करण्यात आली आहे. हा नवा प्लॅटफॉर्म कारला हलकी आणि अधिक सुरक्षित बनवते. याशिवाय या कारचे मायलेज चांगले आहे. या कारची लांबी जास्त नाही आणि ३६९५ मिमीचीच लांबी आहे. अर्थात जुन्या सेलेरियोच्या तुलनेत नव्या सेलेरियोची रुंदी जास्त आहे म्हणजेच १६५५ मिमी आहे. जुन्या मॉडेलपेक्षा नवे मॉडेल मोठे आणि अधिक आकर्षक दिसणारे आहे. कारचा ग्राउंड क्लिअरन्स १७० मिमीपर्यत वाढवण्यात आला आहे. नव्या मॉडेलमध्ये दोन नवीन रंग देण्यात आले आहेत. कारची ग्रिल नव्या स्विफ्टसारखी दिसते. नवीन मॉडेल दिसायला चांगले आहे.

सेलेरियोचे इंटिरियर

कारचा दरवाजा आधीपेक्षा अधिक रुंद आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवे मॉडेल अधिक चांगले आणि मॉडर्न आहे. यामध्ये नवे एसी वेंट लावण्यात आले आहेत. इंटिरियरचा रंग ब्लॅक आणि सिल्व्हर आहे. नवीन मॉडेलचे डिझाइन आणि गुणवत्ता अधिक चांगली आहे. इंटेरियरमध्ये हार्ड प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. ही एक एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. यामध्ये ७ इंची टच स्क्रीन आहे. कारमध्ये स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. ड्रायव्हर सीटची उंची कमी जास्त करता येते. डबल एअरबॅग, एबीएस, हिल होल्ड असिस्टंट, इलेक्ट्रिक आआरव्हीएम आणि रियर पार्किंग सेंसरदेखील देण्यात आले आहेत. टॉप एंड व्हेरिएंटमध्ये क्लायमेट कंट्रोलचे उत्तम फीचर देण्यात आले आहे.

इंजिन आणि मायलेज

सेलेरियोचे इंजिन  67hp/89Nm सोत ड्युएल व्हीव्हीटी पेट्रोल १.० लीटर इंजिन देण्यात आले आहे. यात इंधन क्षमता अधिक चांगली आहे. पेट्रोलच्या प्रकारात नवी सेलेरियो भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. एजीएस व्हेरिएंट २६.६८ किमी प्रति लिटरचे मायलेज देते. तर इतर व्हेरिएंटमध्ये २४.९७ किमी प्रति लिटरचे मायलेज मिळते आहे.

कारची किंमत

नवी सेलेलियो चार व्हेरिएंटमध्ये म्हणजे Lxi, Vxi, Zxi, Zxi+ मध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंटची पेट्रोल प्रकाराची किंमत ४.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.  एएमटीसाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. एएमटी श्रेणीची कार ५०,००० रुपये महाग आहे. टॉप एंड एएमटी व्हेरिएंट ६.९४ लाख रुपयांना मिळते आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी