नवी दिल्लीः भारतात सीएनजी (CNG) गाड्यांची डिमांड आता खूप वाढू लागली आहे. यामुळे देशातील ऑटो कंपन्या (Auto companies) सुद्धा आपल्या लोकप्रिय मॉडल्सला भारतीय बाजारात उतरवत आहेत. मारुती सुझुकीने नुकतेच डिझायरला सीएनजी (Maruti Suzuki Dzire CNG) सोबत आणले आहे. आज आम्ही तुम्हाला या कारच्या फायनान्स प्लान (Finance plan) संबंधी माहिती देणार आहोत. जेणेकरून तुमच्या कार घेण्याचं स्वप्न किती कसं पूर्ण होईल हे जाणून घेण्यास मदत होईल.
दरम्यान मारुती सुझुकीने आपली बेस्ट सेलिंग सेडान कार डिझायरच्या सीएनजी व्हेरियंट्सला नुकतेच भारतात लाँच केले आहे. जी आपल्या सेगमेंट मध्ये बेस्ट मायलेज कार आहे. 8 मार्च रोजी मारुती सुझुकीने 2022 Maruti Dzire S-CNG ला लाँच केले होते. याचे Dzire VXi CNG आणि Dzire ZXi CNG सारखे व्हेरियंट्स आहेत. मारुती डिझायर सीएनजीचे मायलेज 31.12km/kg पर्यंत आहेत. ही सेडान सेगमेंटमध्ये बेस्ट मायलेजची सीएनजी कार म्हणून आणली गेली आहे.
आता कार घ्यायची म्हटलं म्हणजे साहजिकच तुमच्या मनात डाउनपेमेंट लागेल किती ईेएमआयची प्रश्न आली असतील. या प्रश्नांनी तुमच्या मनात वादळ उठवलं असेल. परंतु काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला डाउनपेमेंट किती लागेल, किती ईेएमआय द्यावा लागेल याची माहिती यात देत आहोत...
मारुती डिझायर सीएनजी लोनवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 91 हजार रुपयाचे डाउनपेमेंट करावे लागेल. या कारची सुरुवातीची किंमत 8.14 लाख रुपये आहे. डाउनपेमेंट केल्यानंतर बाकीची रक्कम तुम्हाला ईएमआय द्वारे पे करावी लागेल.
मारुती डिझायर सीएनजी कार लोनवर घेतल्यास तुम्हाला 9.8 टक्के व्याज द्यावे लागेल. तुम्हाला एकूण लोन अमाउंट 8 लाख 21 हजार 539 रुपये द्यावे लागतील. व्याजसह ही रक्कम 10 लाख 42 हजार 500 रुपये होईल. साधरण 60 महिन्यांपर्यत हे कार लोन असेल म्हणजेच 5 वर्षासाठी. या पाच वर्षात तुम्हाला दर महिन्याला 17 हजार 375 रुपये द्यावे लागतील. ही सर्व आकडेवारी कार देखोच्या ईएमआय कॅलक्यूलेटर पेजवरून घेतलेली आहे.