मारुतीने परत मागविल्या ६३ हजार कार, जाणून घ्या कारण 

मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी Ciaz, Ertiga आणि XL6 चे ६३ हजार ४९३ युनिट ग्राहकांकडून परत मागविले आहेत. या कार्सच्या जनरेटर युनिट (एमजीयू) मध्ये प्ऱॉब्लेम असल्याने या कार परत मागविण्यात आल्या आहेत. 

maruti india recalls ciaz ertiga xl6 cars business news in marathi google news
मारुतीने परत मागविल्या ६३ हजार कार, जाणून घ्या कारण   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मारुतीने ६० हजारांपेक्षा अधिक कार बाजारातून परत मागविल्यात
  • मारुतीचे शेअरचे भाव १.७९ घसरले होते. 
  • कंपनीने Ciaz, Ertiga आणि XL6 चे ६३ हजार ४९३ युनिट बाजारातून  परत मागविले आहेत.  

मुंबई : देशातील दिग्गज ऑटोमेकर कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या ६० हजार पेक्षा अधिक कार बाजारातून परत मागविल्या आहेत. मारुतीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सेफ्टी पाहता कंपनीने Ciaz, Ertiga आणि XL6 चे ६३ हजार ४९३ युनिट बाजारातून  परत मागविले आहेत.  

मारुतीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मोटर जनरेटर युनिटमध्ये बिघाड असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मारुती आता या मागविलेल्या सर्व कारची तपासणी करेल. यासाठी ग्राहकांना कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. कंपनीने एक जानेवारी २०१९ ते २१ नोव्हेंबर २०१९ दरम्यान बनविण्यात आलेल्या कारमध्ये हा प्रॉब्लेम असलेल्या कार परत मागविल्या आहेत. कार मागविण्याची ही प्रक्रिया ६ डिसेंबर २०१९ पासून सुरू झाल्यानंतर मारुतीच्या शेअरच्या किंमतीत २ टक्क्यांनी घसरली होती.  गेल्या शुक्रवारी अखेरच्या तासात मारुतीचे शेअरचे भाव १.७९ टक्क्यांनी खाली येत ६८८० रुपयांपर्यंत खाली आले होते. 

नुकतेच मारुती सुझुकीने जानेवारी २०२० पासून आपल्या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीमुळे मारुतीच्या कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. पण अद्याप स्पष केले नाही की या किंमती कधी मिळणार आहेत. 

दुसरीकडे भारतीय बाजारात आतापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त कार विकण्याचा विक्रमही कंपनीने आपल्या नावावर केला आहे. मारुतीने ही किमया ३६ वर्षांत केली आहे. भारतात कंपनी आपली पहिली कार १४ डिसेंबर १९८३ ला लॉन्च केली होती. ही कार कंपनीची सर्वात चर्चीत मारुती ८०० होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी