Maruti CNG Cars : मारुतीचा धडाका! लॉंच केल्या 30 किमी मायलेज देणाऱ्या 3 नवीन स्वस्त सीएनजी कार...

Automobile Update : मारुतीने (Maruti) बाजारात 3 नवीन सीएनजी कार लॉंच केल्या आहेत. या तीन कार म्हणजे बलेनो सीएनजी (Maruti Baleno CNG), एक्सएल 6 सीएनजी (XL6 CNG) आणि स्विफ्ट सीएनजी(Swift CNG). यातील बलेनो आणि एक्सएल6 कार एकाचवेळी लॉंच केल्या होत्या. तर स्विफ्ट त्याआधीच लॉंच करण्यात आली होती.

CNG Car
सीएनजी कार 
थोडं पण कामाचं
  • मारुतीने लॉंच केल्या तीन सीएनजी कार
  • मारुतीची वाहने बाजारात लोकप्रिय
  • इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सीएनजी कारचा खप वाढला

Maruti Best CNG cars : नवी दिल्ली : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुतीने (Maruti) बाजारात 3 नवीन सीएनजी कार लॉंच केल्या आहेत. या तीन कार म्हणजे बलेनो सीएनजी (Maruti Baleno CNG), एक्सएल 6 सीएनजी (XL6 CNG) आणि स्विफ्ट सीएनजी(Swift CNG). यातील बलेनो आणि एक्सएल6 कार एकाचवेळी लॉंच केल्या होत्या. तर स्विफ्ट त्याआधीच लॉंच करण्यात आली होती. ही मॉडेल आधी पेट्रोल इंजिनामध्ये उपलब्ध होती. आता मारुतीने त्यात सीएनजी मॉडेलदेखील आणले आहे. भारतातील सर्वाधिक मायलेज असलेल्या 5 सीएनजी कारपैकी 4 कार मारुतीच्या आहेत. या तिन्ही कारच्या किंमती, वैशिष्ट्ये आणि मायलेज जाणून घेऊया. (Maruti launches 3 CNG car with mileage upto 30 km per kg)

अधिक वाचा- भारतातील या शहरात पहिल्यांदा दिसणार चंद्रग्रहण, जाणून घ्या इतर शहरांमधील ग्रहणाची वेळ

स्विफ्ट सीएनजीची वैशिष्ट्ये (Swift CNG)

मारुतीचे स्विफ्ट हे एक लोकप्रिय मॉडेल आहे. मारुती स्विफ्टच्या VXi आणि ZXi प्रकारांमध्ये CNG किट देण्यात आले आहे. स्विफ्ट VXi सीएनजी मॉडेलची किंमत 7.77 लाख रुपये आहे. तर स्विफ्ट ZXi सीएनजीची किंमत 8,45,000 रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. स्विफ्ट सीएनजी 1.2 एल के-सीरीज ड्युअलजेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिनद्वारे उपलब्ध आहे. ही कार 30.90 किमी/किलो पर्यंतचा मायलेज देऊ शकते.

अधिक वाचा : D Gang: दाऊद इब्राहिम-छोटा शकीलविरुद्ध NIAची मोठी कारवाई

बलेनो सीएनजीचे वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी बलेनोच्या डेल्टा एमटी आणि झेटा एमटीमध्ये आता सीएनजी किट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मारुती बलेनो सीएनजी डेल्टा एमटीची किंमत 8.28 लाख रुपये आहे. तर बलेनो सीएनजी झेटा एमटी व्हेरिएंटची किंमत 9.21 लाख रुपये आहे. या दोन्ही मॉडेलच्या किंमती एक्स-शोरूम आहेत. मारुती बलेनो सीएनजी मॉडेल जबरदस्त 30.61 किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देऊ शकते. मारुतीची बलेनो ही कंपनीच्‍या प्रिमियम नेक्‍सा डीलरशिपवर सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक आहे. 

अधिक वाचा :  Biden on Elon Musk : इलॉन मस्कवर संतापले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन...ट्विटरच्या खोटारडेपणावर ठेवले बोट

एक्सएल 6 सीएनजीची वैशिष्ट्ये

मारुतीने एक्सएल6 मध्ये सीएनजी किट उपलब्ध करून दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे CNG किट फक्त त्याच्या Zeta प्रकारात उपलब्ध आहे. XL6 Zeta CNG ची किंमत 12.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. एक्सएल6 सीएनजी कार 26.32 किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देऊ शकते. हे मॉडेल पेट्रोल मॉडेलपेक्षा 96,000 रुपयांनी महाग आहे.

वाढलेल्या इंधन दरामुळे सीएनजी कार घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांचा कल आता सीएनजी वाहनांकडे (CNG Car) वाढत चालला आहे. सीएनजी वाहनांच्या श्रेणीमध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मारुतीची अर्धा डझनहून अधिक सीएनजी मॉडेल्स आहेत. सीएनजी कारला (CNG car) मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन ऑटोमोबाइल (Automobile) कंपन्यांदेखील नवनवीन सीएनजी मॉडेल बाजारात आणत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी