अवघ्या 11 हजारांत बुक करा Maruti Suzuki Grand Vitara, एक लिटर पेट्रोलवर चालणार 28 KM

Maruti Suzuki Grand Vitara 2022: मारुती सुझुकी कंपनीने भारतीय बाजारात नवी ग्रँड विटारा मिडसाइज हायब्रिड एसयूव्ही लॉन्च केली आहे. अवघ्या 11 हजारांत तुम्ही ही गाडी बुक करु शकता. 

Maruti Suzuki Grand Vitara 2022 unveiled check price feature and specifications
Photo Credit: Maruti Suzuki 
थोडं पण कामाचं
  • मारुती सुझुकीने नवी ग्रँड विटारा केली लॉन्च
  • नव्या विटारामध्ये जबरदस्त फिचर्स मिळणार आहेत
  • केवळ फिचर्सच नाहीत तर सेफ्टीच्या बाबतीतही नवी हायब्रिड एसयूव्ही दमदार आहे 

Maruti Suzuki Grand Vitara SUV unveil: मारुती सुझुकीने भारतीय बाजारात आपली नवी आणि दमदार अशी ग्रँड विटारा मिडसाइज एसयूव्ही लॉन्च केली आहे. या नव्या एसयूव्हीची स्पर्धा भारतातीय बाजारात सध्या असलेल्या ह्युंदाई क्रेटा, सेल्टॉस, एमजी अ‍ॅस्टर, टाटा हॅरिअर आणि इतर मिडसाईज एसयूव्ही सोबत असणार आहे. नवी Maruti Suzuki ची नवी Grand Vitara SUV तुम्ही अवघ्या 11000 रुपयांत बुक करु शकता. मारुती सुझुकी कंपनी या कारची किंमत ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. (Maruti Suzuki Grand Vitara 2022 unveiled check price feature and specifications)

मारुती सुझुकीने लॉन्च केलेली ही नवी एसयूव्ही टोयोटासोबत मिळून तयार केली आहे. नवीन ग्रँड विटारामध्ये वापरण्यात आलेले बहुतेक पार्ट्स हे भारतात आधीच लॉन्च करण्यात आलेल्या टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरमधून घेण्यात आले आहेत. या दोन्ही एसयूव्ही Suzukiच्या ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. ज्याचा वापर मारुती सुझुकी ब्रेझा आणि एस-क्रॉस या गाड्यांमध्येही करण्यात आला आहे. दोन्ही एसयूव्हीचं इंजिन, गिअरबॉक्स आणि इतर पार्ट्स सुद्धा एकसारखे आहेत.

अधिक वाचा : SUV craze : भारतीयांचे वाढते SUV प्रेम ...कंपन्यांनी पाच वर्षांत लॉंच केली 36 मॉडेल्स

नव्या ग्रँड विटाराचा लूक कसा? 

या नव्या एसयूव्हीच्या पुढील भागात स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन देण्यात आलं आहे. प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले असून एलईडी डीआरएलसोबत आहे. मागील बाजुला नजर टाकली तर स्लीम एलईडी टेललॅम्प देण्यात आलं आहे. कंपनीने ग्रँड विटाराला 6 सिंगल आणि 3 ड्युअल टोन रंगांत लॉन्च केली आहे. या एसयूव्हीच्या साईजचं बोलायचं झालं तर लांबी 4345 mm आणि रुंदी 1795 mm तर व्हीलबेस 2600 mm इतकं आहे.

अधिक वाचा : आता इलॉन मस्कच्या Tesla चं काय खरं नाय! Hyundai च्या लक्झरी कारवरुन नजरच हटेना

इंटेरिअर आणि फिचर्स 

मारुती सुझुकीने लॉन्च केलेली नवी ग्रँड विटाराचं इंटेरिअर ब्लॅक आणि ब्राऊन थीममध्ये देण्यात आलं आहे. सीट्सला ब्लॅक लेदर देण्यात आलं आहे. यासोबतच स्मार्ट हायब्रिट व्हेरिएंटला सिल्व्हर एक्सेंटचे सीट कवर्स मिळणार आहेत. ग्रँड विटारा मारुती सुझुकीची पहिली गाडी आहे ज्यामध्ये पॅनारोमिक सनरूफ देण्यात आलं आहे. यासोबतच 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

अधिक वाचा : Jio Offer on Laptop : लॅपटॉप खरेदीवर मिळवा एक वर्षासाठी डेटा फ्री, पाहा जिओची खास ऑफर...

9 इंचाचा इंन्फोटेन्मेंट

इतर फिचर्सचं बोलायचं झालं तर, वेंटिलेटेड सीट्स, की लेस एन्ट्री, रियर एसी वेंट्स, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप, यूएसबी पोर्ट्स सारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच गाडीत 9 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम मिळतो जो अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करतो.

इंजिनचे पर्यायही उपलब्ध

नवीन गँड विटारा दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध होणार आहे. 1.5 लीटर माइल्ड हायब्रिड इंजिन आणि 1.5 लिटर स्ट्रॉन्ग बायब्रिड इंजिनचा समावेश आहे. स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनला टोयोटाद्वारा डेवलप करण्यात आलं आहे. एसयूव्हीचं माइल्ड इंजिन 100 पीएस आणि 135 Nm पीक टॉर्क जनरेट करतो. या इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही एसयूव्ही 21.11 किमी प्रति लिटरचा मायलेज देते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी