जबरदस्त ऑफर! फक्त १.३० लाखात विकत घ्या, ४ लाखांची कार, अशी आहे ऑफर

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 26, 2021 | 16:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maruti Alto 800 LXI कारची किंमत जवळपास ४ लाख रुपये आहे. मात्र तुम्ही ही कार फक्त १.३० लाख रुपयांत विकत घेऊ शकता.

Bumper offer, buy Alto 800 LXI second hand car for  Rs.1.30 lacs
मारुती अल्टो ८०० एलएक्सआय फक्त १.३० लाख रुपयांत 

थोडं पण कामाचं

  • मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू
  • मारुती अल्टो ८०० एलएक्सआय फक्त १.३० लाखांत
  • सहा महिन्यांच्या वॉरंटीसह

नवी दिल्ली : कोरोनाच्या या संकटकाळात स्वत:चे वाहन असणे आवश्यक झाले आहे. मात्र यासाठी कार बजेटमध्ये असायला हवी. तुम्हाला जर माफक किंमतीत चांगली कार विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. तुमच्यााठी अशीच एक ऑफर उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला ४ लाख रुपये किंमतीची कार फक्त १.३० लाख रुपयांत विकत घेता येणार आहे. जबरदस्त फिचर्स असलेली ही कार आहे, मारुती अल्टो ८०० एलएक्सआय ( Maruti Alto 800 LXI).

मारुती अल्टो ८०० एलएक्सआय

मारुतीची ही अल्टो ८०० एलएक्सआय कार सेकंड हॅंड कार आहे. मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू (True value )च्या वेबसाईट ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार मारुती सुझुकीचे जेन्युईन पार्ट्सने युक्त आहे. याशिवाय ही कार विकत घेतल्यास तुम्हाला ३ फ्री सर्व्हिसचादेखील लाभ मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला ६ महिन्यांची वॉरंटीदेखील मिळणार आहे.

कारबद्दल काही खास माहिती


मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू (True value ) वेबसाईटवर या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मारुती अल्टो ८०० एलएक्सआय ( Maruti Alto 800 LXI)मॉडेलची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ही एक सेंकड हॅंड कार आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिन आहे. २०१६ हे मॉडेल आहे. ही कार आतापर्यत एकूण ६०,९४१ किलोमीटर चालली आहे. या कारचा रंग व्हाईट आहे आणि यात मॅन्युअल ट्रान्समिशन रेटिंग आहे.

या कारबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल देऊन माहिती मिळवू शकता. यासोबतच तुम्ही या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करू शकता आणि या कारच्या डिलरशी देखील संपर्क करू शकता. याशिवाय (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-ajmer-2016/AXerHbHUNiwKO4z0Jo0L) या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.

नव्या मारुती अल्टो ८०० एलएक्सआय ( Maruti Alto 800 LXI)कारची किंमत


नव्या मारुती अल्टो ८०० एलएक्सआय ( Maruti Alto 800 LXI)कारची एक्स-शोरुम किंमत ३.७६ लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये ७९६ सीसी इंजिन देण्यात आलेले आहे, शिवाय ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येते. कारचे इंजिन ४७.३ बीएचपीची शक्ती तयार करते आणि ही कार २२.०५ किलोमीटर प्रति लिटरचे माईलेज देते. याशिवाय या कारमध्ये अॅंटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसोबत इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
 

मारुती सुझुकी ही देशातील नंबर वन कार उत्पादक कंपनी आहे. मारुतीची वेगवेगळी मॉडेल भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. आजही मध्यमवर्गीयांकडून मारुती कारलाच प्राधान्य दिले जाते. जागतिकीकरणानंतर भारतीय बाजारपेठेत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कार उपलब्ध झाल्या आहेत. फक्त फॅमिली कारच नव्हे तर हॅचबॅक, लक्झरी, एसयुव्ही, युटिलिटी, सेडान यासारख्या विविध श्रेणीतील कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या स्पर्धेतही मारुती सुझुकीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी