Maruti Suzuki | आजपासून अल्टो १२.५ हजार तर वॅगन आर ३० हजार रुपयांपर्यंत महाग; स्विफ्ट आणि बलेनोची किंमत किती?

Car Price : मारुती सुझुकीने आपल्या मॉडेल्सच्या किंमती ४.३ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. ही दरवाढ शनिवारपासून लागू झाली आहे. कच्चा माल, वस्तूंच्या किमती आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने वाहनाच्या किमतीत वाढ (price hike) करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सर्व मॉडेल्सची किंमत ०.१ ते ४.३ टक्क्यांनी वाढवली आहे.

Maruti Suzuki Car Price hike
मारुती सुझुकीच्या कारच्या किंमतीत वाढ 
थोडं पण कामाचं
  • मारुती कारच्या किंमतीत आजपासून वाढ
  • अल्टो १२.५ हजार तर वॅगन आर ३० हजार रुपयांपर्यंत महाग
  • मारुती सुझुकीने २०२१ मध्ये एकूण ४.९ टक्क्यांनी किंमती वाढवल्या

Maruti car price hike : नवी दिल्ली : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki)नवीन वर्षात आपल्या मॉडेल्सच्या किंमती ४.३ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. ही दरवाढ शनिवारपासून लागू झाली आहे. कच्चा माल, वस्तूंच्या किमती आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने वाहनाच्या किमतीत वाढ (price hike) करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सर्व मॉडेल्सची किंमत ०.१ ते ४.३ टक्क्यांनी वाढवली आहे.  कंपनीने म्हटले आहे की त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किंमती सरासरी १.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मारुती सुझुकी ३.१५ लाख रुपयांची अल्टो ते १२.५६ लाख रुपयांपर्यंतच्या एस-क्रॉस पर्यंतच्या कारचे उत्पादन आणि विक्री करते. (Maruti Suzuki rises price of cars from today, check the details)

मॉडेलनुसार किंमत किती रुपयांनी वाढली?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मारुती सुझुकीने २०२१ मध्येही तीन वेळा किंमतीमध्ये वाढ केली होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने कारच्या किंमती १.४ टक्क्यांनी वाढवल्या होत्या, तर एप्रिलमध्ये १.६ टक्के आणि नंतर सप्टेंबरमध्ये १.९ टक्क्यांनी वाढ केली होती. मारुती सुझुकीने २०२१ मध्ये एकूण ४.९ टक्क्यांनी किंमती वाढवल्या आहेत. गेल्या महिन्यातच कंपनीने सांगितले होते की स्टील, अॅल्युमिनियम, तांबे, प्लास्टिकच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षभरात कंपनीच्या उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटातून कंपनीला वाचवण्यासाठी कंपनीच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

मॉडेलनुसार किती रुपयांनी वाढली आहे किंमत- 

मारुती सुझुकी मॉडेल्स                        कारच्या किंमतीतील वाढ 2022 (रुपयांमध्ये)
अल्टो 800 12,500
S-प्रेसो 12,500
वॅगन आर 30,000
सेलेरियो 16,000
इग्निस 15,000
स्विफ्ट 15,000
बलेनो 21,000
डिझायर 10,000
टूर S 8,000
सियाज 15,000
विटारा ब्रिझा 14,000
अर्टिगा 21,000
XL6 16,000
एस- क्रॉस 21,000
ईको 27000
सुपर कॅरी 10,000

वाहनांसाठीचा नवा नियम

भारत सरकारने आधीच सर्व प्रवासी वाहनांना किमान दोन एअरबॅग असणे बंधनकारक केले आहे. यातील एक एअरबॅग ड्रायव्हरसाठी आणि एक पुढील सीटवरील सहप्रवाशासाठी आहे. गडकरी म्हणाले की, डोक्यावर होणारी टक्कर आणि बाजूने होणारी टक्कर कमी करून प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये आणखी चार एअरबॅग्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर एकूण 1.16 लाख रस्ते अपघात झाले ज्यात 47,984 लोकांचा मृत्यू झाला.

मारुतीची सीएनजी वाहने

मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. मारुती कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक सीएनजी वाहने आणली आहेत, ज्यांची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. कंपनी अल्टो (Alto), एस-प्रेसो S-Presso, वॅगनार (WagonR) आणि अर्टिगा (Ertiga) च्या सीएजनजी (CNG) आवृत्त्यांची विक्री करत आहे. दरम्यान याच महिन्याच्या शेवटी पर्यंत नव्या सीएनजी मॉडेलचे बाजारात आगमन होणार आहे. यासोबतच कंपनी स्विफ्ट आणि डिजायरच्या (Swift And Dzire) देखील सीएनजी आवृत्तीची चाचपणी करत आहे. दरम्यान लक्षणीय बाब म्हणजे मारूती नवीन ब्रेझाचे देखील सीएनजी मॉडेल बनवले जाणार आहे, ज्याला एप्रिल २०२२ पर्यंत लॉंच करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी