New Maruti Suzuki Alto : मारुती सुझुकी अल्टो 800 चा नवीन जबरदस्त अवतार, मिळणार कमी किंमतीत शक्तिशाली वैशिष्ट्ये आणि मायलेज

New Maruti Car : मारुती सुझुकी (Maruti Suzuki)ही देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. एका अहवालानुसार, मारुती सुझुकीच्या कार विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय बाजारपेठेत मारुतीची वाहने लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा कमी किंमतीत जास्त मायलेजची चर्चा होते तेव्हा मारुती सुझुकीच्या कारचादेखील उल्लेख होतो. ग्राहकांनादेखील परवडणाऱ्या किंमतीत चांगला मायलेज हवा असतो. ही वैशिष्टये मारुतीच्या कारमध्ये मिळतात आणि कारच्या मेंटेनन्समध्ये खर्चदेखील कमी येतो.

Maruti Suzuki Alto 800
मारुती सुझुकी अल्टो 800 चा नवा अवतार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मारुति सुझुकीची वाहने देशात लोकप्रिय आहेत
  • मारुती सुझुकी अल्टो 800 चा नवीन अवतार बाजारात येणार
  • ग्राहकांना कमी किंमतीत मिळणार जास्त मायलेज

Maruti Suzuki Alto latest news : नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki)ही देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. एका अहवालानुसार, मारुती सुझुकीच्या कार विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय बाजारपेठेत मारुतीची वाहने लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा कमी किंमतीत जास्त मायलेजची चर्चा होते तेव्हा मारुती सुझुकीच्या कारचादेखील उल्लेख होतो. ग्राहकांनादेखील परवडणाऱ्या किंमतीत चांगला मायलेज हवा असतो. ही वैशिष्टये मारुतीच्या कारमध्ये मिळतात आणि कारच्या मेंटेनन्समध्ये खर्चदेखील कमी येतो. मारुतीची अल्टो (Maruti Suzuki Alto 800) हे अत्यंत लोकप्रिय मॉडेल आहे. आता अल्टो नव्या अवतारात बाजारात उपलब्ध होणार आहे. नव्या अल्टोच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया. (Maruti Suzuki to launch new attractive model of Alto 800, check the features)

अधिक वाचा : CWG22: झटपट जिंकली ४ GOLD , भारत २२ GOLD मेडलसह चौथ्या स्थानी

मारुती सुझुकीची अनेक मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. मात्र त्यातही मारुती सुझुकी अल्टो 800 हे मॉडेल ग्राहकांना खूप आवडते. हे कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. म्हणजेच ही कार त्याच्या व्हेरियंटची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. त्याच वेळी, अशी माहिती आहे की कंपनी या कारचे नवीन प्रकार बाजारात आणणार आहे. असे सांगितले जाते आहे की मारुती सुझुकी अल्टो 800 च्या या नवीन अवतारला अधिक मायलेज मिळेल. म्हणजेच आता तुम्हाला कमी किंमतीत जास्त मायलेज मिळू शकणार आहे. अल्टोबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

अधिक वाचा : Bhandara Gangrape : भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी हलगर्जीपणा केल्यामुळे दोन पोलीस अधिकारी निलंबित, महिला आयोगाच्या अध्यक्षा नागपुरात दाखल

मारुती सुझुकी अल्टो 800 (Maruti Suzuki Alto 800)

या मारुती सुझुकी अल्टो 800 चे नवीन प्रकार नव्या पिढीच्या सुझुकी हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर डिझाइन केले गेले आहे. त्यामुळे कारच्या मायलेजमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचवेळी, मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मारुती अल्टोची रचना मारुती सुझुकी एस-प्रेसो सारखीच करण्यात आली आहे. या प्रकारात, तुम्हाला डॅशबोर्ड आणि इतर अनेक वैशिष्ट्ये बदललेली दिसतील. फीचर्स म्हणून, तुम्हाला या कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

अधिक वाचा : कठीण काळात उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या शिवसेनेच्या 'या' आमदाराला मिळणार मोठं रिटर्न गिफ्ट

त्याच वेळी, असे मानले जाते की नवीन मॉडेलमध्ये अधिक वैशिष्ट्यांमुळे त्याची किंमत वाढू शकते. सध्या मारुती सुझुकी अल्टोच्या बेसिक मॉडेलची किंमत 3.15 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 4.82 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

मारुतीची इलेक्ट्रिक कार येणार

सध्या ऑटोमोबाइल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढते आहे. अनेक आघाडीच्या कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) बाजारात उपलब्ध आहेत. टाटा मोटर्स (Tata Motors) सध्या भारतातील इलेक्ट्रिक वाहन विभागात आघाडीवर आहे. टाटांच्या साम्राज्याशी स्पर्धा करण्यासाठी मारुती (Maruti) आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचे प्लनिंग करते आहे. वाहनाची किंमत कमी ठेवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे जेणेकरून ती बाजारात वर्चस्व गाजवू शकतील. मारुती सुझुकीने खरखोडा, हरियाणा येथे पुढील गरजा लक्षात घेऊन नवीन कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. या कारखान्याच्या पहिल्या टप्प्यात 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी