Maruti Electric Car : नवीन कार घेण्याचा प्लॅन आहे? मग मारुती लॉंच करतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार...

New Maruti Car : सध्या ऑटोमोबाइल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढते आहे. अनेक आघाडीच्या कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) बाजारात उपलब्ध आहेत. टाटा मोटर्स (Tata Motors) सध्या भारतातील इलेक्ट्रिक वाहन विभागात आघाडीवर आहे. टाटांच्या साम्राज्याशी स्पर्धा करण्यासाठी मारुती (Maruti) आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचे प्लनिंग करते आहे. आता एक नवीन अपडेट देखील समोर आले आहे.

new Maruti car
मारुती आणणार नवी इलेक्ट्रिक कार 
थोडं पण कामाचं
  • ऑटोमोबाइल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढतेय
  • टाटा मोटर्स (Tata Motors) सध्या भारतातील इलेक्ट्रिक वाहन विभागात आघाडीवर
  • टाटांच्या साम्राज्याशी स्पर्धा करण्यासाठी मारुती (Maruti) आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचे प्लनिंग करते आहे

Electric Vehicles : नवी दिल्ली : सध्या ऑटोमोबाइल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढते आहे. अनेक आघाडीच्या कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) बाजारात उपलब्ध आहेत. टाटा मोटर्स (Tata Motors) सध्या भारतातील इलेक्ट्रिक वाहन विभागात आघाडीवर आहे. टाटांच्या साम्राज्याशी स्पर्धा करण्यासाठी मारुती (Maruti) आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचे प्लनिंग करते आहे. आता एक नवीन अपडेट देखील समोर आले आहे. मारुती सुझुकी 2024-25 पासून सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या गुजरात कारखान्यात इलेक्ट्रिक मॉडेल्सचे उत्पादन सुरू करेल. कंपनीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी ही माहिती दिली आहे. (Maruti Suzuki to launch new electric SUV in Indian market)

अधिक वाचा : CWG 2022: भारताच्या पी.व्ही सिंधूला गोल्ड मेडल, बॅडमिंटनच्या एकेरीत मिळाले मेडल

समोर आलेल्या माहितीनुसार, वाहनाची किंमत कमी ठेवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे जेणेकरून ती बाजारात वर्चस्व गाजवू शकतील. मारुती सुझुकीने खरखोडा, हरियाणा येथे पुढील गरजा लक्षात घेऊन नवीन कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. या कारखान्याच्या पहिल्या टप्प्यात 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सीएनजी आणि प्रवासी विभागात मारुतीचे वर्चस्व 

सीएनजीसह प्रवासी विभागात मारुती सुझुकीचे वर्चस्व आहे. पण आता मारुती इलेक्ट्रिक वाहन आणण्याच्या तयारीत आहे. ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. जे सुझुकी-टोयोटा यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. रिपोर्टनुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2024 च्या सणासुदीच्या आसपास बाजारात येईल.

अधिक वाचा : विस्ताराच्या दिशेने शिंदे-फडणवीस सरकारची हालचाल; शिंदेंच्या भेटीसाठी फडणवीस नंदनवनात, उद्याच होणार विस्तार?

500 किमी श्रेणी

मारुतीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2WD आणि 4WD अशा दोन्ही प्रकारच्या ड्राइव्हट्रेन पर्यायांसह येईल. 2WD प्रकारात 48kWh बॅटरी पॅक आणि 138bhp मोटर मिळू शकते. सुमारे 400 किमीची रेंज देणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, 4WD प्रकारात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि एक मोठा 59kWh बॅटरी पॅक असेल. त्याची रेंज सुमारे 500 किमी असू शकते.

अधिक वाचा : New Whatsapp Feature : व्हॉट्सअपचं भन्नाट फिचर! आता इतरांपासून लपवू शकता तुमचा नंबर

मारुतीच्या नव्या कारची किंमत

समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक SUV ची किंमत 13 लाख ते 15 लाख रुपये ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतात नवीन कार खरेदी करताना, लूक आणि परफॉर्मन्ससह ती किती मायलेज देते याकडे बरेच लक्ष दिले जाते. सध्या देशात अशी अनेक वाहने आहेत जी चांगल्या मायलेजसाठी ओळखली जातात. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ते टाटा (Tata), ह्युंदाई (Hyundai) सारख्या ब्रँडची वाहने केवळ कामगिरीतच उत्कृष्ट नाहीत, तर मायलेजच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर आहेत.

कोरोना महामारीच्या संकटानंतर भारतीय वाहन उद्योग आता सावरण्यास सुरूवात झाली आहे. वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसते आहे. सर्वच कंपन्या त्यामुळे आता विविध श्रेणीतील नव्या गाड्या बाजारात आणत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांवरदेखील कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. टाटा मोटर्सने तर इलेक्ट्रिक वाहनांवर देखील आपले लक्ष केंद्रित केले असून कंपनीच्या इलेक्ट्रिक कार बाजारात लोकप्रिय झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी