Toyota च्या वर्चस्वाला बसणार धक्का; Innova च्या अर्ध्या किमतीत Maruti Suzuki बाजारात आणणार दमदार कार

Toyota Innova vs Maruti Suzuki : भारतीय बाजारात टोयोटा इनोव्हा कारचा मोठा दबदबा पहायला मिळतो. हेच लक्षात घेत मारुती सुझुकीने आता आपली नवी एमपीव्ही बाजारात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maruti suzuki xl7 soon launch in market will comete toyota innova read price and other details in marathi
Toyota च्या वर्चस्वाला बसणार धक्का; Innova च्या अर्ध्या किमतीत Maruti Suzuki बाजारात आणणार दमदार कार 
थोडं पण कामाचं
  • टोयोटा इनोव्हाला तोडीस तोड उत्तर देणार मारुती सुझुकीची नवी एमपीव्ही
  • किंमतही कमी अन् मायलेजही जास्त देणार
  • मारुती सुझुकीच्या या नव्या गाडीची किंमत 9.85 लाखांपासून सुरू होणार असल्याची शक्यता

Maruti Suzuki XL7 MPV price specifications: भारतीय बाजारात मारुती सुझुकी आणि टोयोटा या ब्रँण्ड्सचं वर्चस्व पहायला मिळतं. स्वस्त कार देणारी मारुती सुझुकी आता एमपीव्ही सेगमेंटमध्ये टोयोटाला टक्कर देण्यासाठी तयार आहे. मारुतीने आपली प्रीमियम एमपीव्ही एक्सएल 7 (Maruti Suzuki MPV XL7) बाजारात लॉन्च करणार आहे. ही गाडी इनोव्हा क्रिस्टा आणि हायब्रिड या दोन्ही कारसाठी मोठी स्पर्धा निर्माण करेल असा दावा केला जात आहे. या नव्या गाडीत हायब्रिड इंजिनसोबत जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर ही गाडी इनोव्हा गाडीच्या किमतीहून अर्ध्या किमतीत उपलब्ध होईल असं बोललं जात आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती एक्सएल 7 मध्ये कंपनीने 1.5 लिटरचं 15 बी पेट्रोल इंजिन देण्यात येईल. जे 103 bhp पावर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करेल. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटो ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध करुन दिले जातील.

हे पण वाचा : पायांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोप्या टिप्स

हायब्रिड देईल अधिक मायलेज

मारुती या खास एमपीव्हीमध्ये सुझुकी स्मार्ट हायब्रिड व्हिएकल टेक्नोलॉजीचा वापर करणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे ही कार मायलेज खूपच चांगला देईल. एक्सएल 7 मॅन्युअल व्हेरिएंट संदर्भात कंपनीने दावा केला आहे की, ही गाडी 19 किमी प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 17.99 किमी प्रति लिटर मायलेज देईल. या गाडीत प्रीमियम सेफ्टी फिचर्स देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये ड्युअल एअरबॅग, ईबीडी, एबीएस, रिअर पार्किंग सेंसर, हिल होल्ड कंट्रोल यासारख्या फिचर्सचा समावेश असणार आहे.

हे पण वाचा : या व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस

किंमतही अर्ध्याहून कमी

मिडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकीच्या या कारच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर ही गाडी टोयोटा इनोव्हाच्या किमतीच्या अर्ध्या दरात उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ही गाडी झेटा आणि अल्फा या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात येईल. या गाडीच्या झेटा व्हेरिएंटची किंमत 9.85 लाख रुपये आणि अल्फा व्हेरिएंटची किंमत 10.36 लाख रुपये एक्स शोरूम असेल अशी माहिती समोर आली आहे. तर टोयोटाच्या इनोव्हा बेस मॉडलची किंमत 20 लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते.

एक्सएल 7 मध्ये अँड्रॉईड ऑटोसह अ‍ॅप्पल कार प्ले याच्यासह 7 इंचाचं इन्फोटेन्मेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी, पुश बटन स्टार्ट यासारखे फीचर्स मिळणार आहेत. तर या गाडीच्या टॉप व्हेरिएंटमध्ये लेदर अपहॉल्स्ट्री मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी