मारुती सुझुकीच्या WagonRचं नवं एडिशन, पाहा किंमत आणि मायलेज 

Maruti Suzuki WagonR S-CNG is now BS 6: मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी बीएस -6 उत्सर्जन मानकांशी सुसंगत वॅगनआर सीएनजी व्हेरिएंट लाँच केलं आहे. 

maruti suzuki's wagonr edition launch see price and mileage 
मारुती सुझुकीच्या WagonR नवं एडिशन, पाहा किंमत आणि मायलेज   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी WagonR BS-6 उत्सर्जन मानकांच्या अनुरूप सीएनजी व्हेरिएंट कार शुक्रवारी बाजारात लाँच केली आहे. या कारची  शोरूम किंमत ही ५.२५ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. कंपनीने असं म्हटलं आहे की, नवीन उत्सर्जन मानकांच्या अनुषंगाने वॅगनआर एस-सीएनजीचं हे तिसरं व्हेरिएंट आहे. यामध्ये ६० लिटरची इंधन टाकी आहे. ही कार प्रति किलो ३२.५२ किलोमीटर एवढा मायलेज देते. असा कंपनीचा दावा आहे. 

कंपनीने वॅगनआर एस-सीएनजीचे दोन व्हेरिएंट  एलएक्सआय आणि एलएक्सआय (ओ) लाँच करण्यात आले आहेत. या कारची शोरूम किंमती अनुक्रमे ५.२५ लाख आणि ५.३२ लाख रुपये आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक (विक्री व विपणन) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, मिशन ग्रीन मिलियनच्या घोषणेसह आम्ही देशातील पर्यावरणास अनुकूल वाहतुकीला चालना देण्यासाठी आम्ही आमची वचनबद्ध असल्याचं जाहीर केलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने सांगितलं होतं की, मिशन ग्रीन मिलियन अंतर्गत पुढील काही वर्षांत सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचे दहा लाख गाड्यांची विक्री करण्याची योजना आहे. 

मारुती सुझुकीच्या कारच्या किंमतीत वाढ

दरम्यान, गेल्या वर्षी मारुती सुझुकी कंपनीच्या कारच्या विक्रीत घट झाली होती आणि त्यानंतर कंपनीने आपल्या विविध कारच्या मॉडल्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मारुती सुझुकीने डिसेंबर 2019 मध्ये 1,22,784 वाहनांची विक्री केली होती. तर नोव्हेंबर 2019 मध्ये 1,39,133 वाहनांची विक्री केली होती. म्हणजेच नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये वाहन विक्रीच्या तुलनेत 11.75 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय)ने आपल्या काही मॉडल्सच्या किमतीत वाढ केली आहे. यानुसार काही मॉडल्सच्या किमतीत 10,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कार निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनीने आपल्या विविध मॉडल्सच्या किमतीत वेगवेगळी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागील काही दिवसात कारच्या किंमती वाढल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...