Maruti Swift: मारुती स्विफ्टचं स्पेशल एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maruti Swift special edition: देशातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या हॅचबॅक स्विफ्ट कारचं खास व्हेरिएंट  बाजारात आणलं आहे.

Maruti_Suzuki_Swift_Limited_Edition
मारुती स्विफ्टचं स्पेशल एडिशन लाँच, पाह किंमत आणि फीचर्स  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • मारुतीने हॅचबॅक स्विफ्ट कारचं खास व्हेरिएंट केलं लाँच
 • नियमित मॉडेलपेक्षा 24,999 रुपये अधिक किंमत आहे.
 • ब्लॅक थीमसह स्विफ्ट कारचं खास व्हेरिएंट करण्यात आलंय लाँच

मुंबई: Maruti Swift special edition: सणासुदीच्या काळात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने आपल्या हॅचबॅक स्विफ्ट या कारचं खास व्हर्जन बाजारात आणलं आहे. त्याची किंमत नियमित मॉडेलपेक्षा २४,९९९ रुपये अधिक आहे. दिल्लीच्या शोरूममधील स्विफ्टच्या नियमित मॉडेलची किंमत ५.१९ लाख ते ८.०२ लाख रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, स्विफ्टचं खास व्हेरिएंट हे  ब्लॅक थीमसह लाँच करण्यात आलं आहे.

MSI चे कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्विफ्ट आमच्या पोर्टफोलिओमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. स्विफ्टच्या माध्यमातून आम्ही प्रीमियम हॅचबॅक सेक्शनमध्ये आमची अग्रगण्य स्थिती एकत्रित करण्यास सक्षम आहोत.

मारुती सुझुकी स्विफ्ट स्पेशल एडिशनमध्ये काय-काय समाविष्ट आहे?

 1. ग्लॉस ब्लॅक बॉडी किट
 2. एरोडायनामिक स्पॉयलर
 3. बॉडी साइड मोल्डिंग
 4. डोअर व्हायझर
 5. ग्रील, टेल लॅम्प आणि फॉग लॅम्पयावर ऑल-ब्लॅक गार्निश
 6. स्पोर्टी राऊंड डायल
 7. फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील
 8. स्पोर्टी सीट कव्हर

शशांक श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितलं की, कंपनीच्या सर्व डीलरशिपकडे मारुती स्विफ्टचं नवं व्हर्जन उपलब्ध होईल.  मारुतीनेआतापर्यंत स्विफ्टच्या २३ लाख युनिट्सची विक्री केली आहे.

मारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर

मारुती सुझुकी (maruti suzuki) इंडियाने आपलं वाहन सबस्क्रिप्शन (subscription) कार्यक्रम 'मारुती सुझुकी सबस्क्राईब' सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुरुवारी सांगितलं की, कंपनीने आता हा कार्यक्रम दिल्ली, एनसीआर (नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम) आणि बंगळुरु येथे सुरू केलं आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरातील ६० शहरांमध्ये हा कार्यक्रम सुरु करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.

मारुती सुझुकीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी या कार्यक्रमासाठी जपानची उपकंपनी ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस इंडियाशी करार केला आहे. या सेवे अंतर्गत ग्राहक मारुती सुझुकी अरिना ते नवीन स्विफ्ट डिजायर, विटारा ब्रेझा, अर्टिगा तर नेक्सामधून नवीन बलेनो, सियाज आणि एक्सएल 6 ची कार घेण्याचा विकल्प निवडू शकतात.

कंपनीने म्हटले आहे की, या कार्यक्रमांतर्गत ग्राहक (customers) वाहनाची मालकी न घेता नवीन कार (New Car) वापरू शकतात. यासाठी त्यांना मासिक फी (monthly fee) भरावी लागेल. या मासिक शुल्कात  संपूर्ण देखभाल, विमा आणि रस्त्यावर गाडी खराब झाल्यावर सहाय्य यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी