Maruti Baleno: मारुतीच्या बलेनो कारचा नवा विक्रम, 'एवढ्या' कारची करण्यात आली व्रिकी 

Maruti Baleno Car Sales: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने बालेनो कारच्या विक्रीचा नवा विक्रम नोंदविला आहे.

Maruti_Suzuki_Baleno_Rear
बलेनो कारचा नवा विक्रम, 'एवढ्या' कारची करण्यात आली व्रिकी  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी सांगितले की, प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोने आठ लाख युनिटची विक्री केली आहे. कंपनीने २०१५ मध्ये भारतीय बाजारात ही कार लाँच केली होती.  कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की ५९ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने आठ लाख विक्रीचा विक्रमी टप्पा ओलंडला आहे.

मारुती सुझुकीचे विपणन व विक्री कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की, 'पाच वर्षांच्या अल्प कालावधीत आठ लाख ग्राहकांची आकडेवारी ही महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. हे आमच्या बलेनोची ओळख देण्याच्या ग्राहकभिमुख धारणा प्रतिबिंबित करते.'

ते म्हणाले की बलेनोने कंपनीला प्रीमियम हॅचबॅक प्रकारात स्वत:ला स्थापित करण्यास मदत केली आहे. कंपनीने 'नेक्सा' विक्री केंद्राला देखील एक नवी ओळख दिली आहे.

मारुती कंपनीने २०१५ साली बलेनो कार लॉन्च केल्यानंतर आतापर्यंत ८ लाख युनिट्सची विक्री केली आहे. तर, 2019 मध्ये बलेनो ने 2.2 लाख युनिट्सची विक्री केली होती. मारुती सुझुकी कंपनीने २०१९ मध्येच बलेनोचं BS6 व्हेरिएंट लॉन्च केलं होतं. ज्या कारची सुरुवाती किंमत 5.58 लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) होती. 

तर, लिथिटयम आयर्न बॅटरीसोबतच स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजी बलेनोचे दोन व्हेरिएंट जिटा आणि डेल्टा 1.2 लिटरमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत क्रमश: 7.25 लाख आणि 7.86 लाख रुपये इतकी आहे.

बलेनो कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल आणि १.३ लिटर टर्बो चार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. याचं पेट्रोल इंजिन ८२ bhp पॉवर आणि ११३ Nm  पिक टॉर्क जेनरेट करतं. तर याचं डिझेल इंजिन हे ७४ bhp पॉवर  आणि १९० Nm पिक टॉर्क जनरेट करतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी