electric bus : 'या' देवस्थानला मिळाल्या 10 इलेक्ट्रिक बस

Megha Engineering and Infrastructure Limited and Olectra Greentech Company gift 10 electric buses to Tirupati Devasthan : प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक वाहने वापरण्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. या प्रयत्नात आता भारतातील एक महत्त्वाचे देवस्थान सहभागी झाले आहे.

electric bus
'या' देवस्थानला मिळाल्या 10 इलेक्ट्रिक बस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • electric bus : 'या' देवस्थानला मिळाल्या 10 इलेक्ट्रिक बस
  • दहा इलेक्ट्रिक बस दक्षिणा म्हणून मिळाल्या
  • बस मंदिर परिसरात भाविकांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातील

Megha Engineering and Infrastructure Limited and Olectra Greentech Company gift 10 electric buses to Tirupati Devasthan : प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक वाहने वापरण्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. या प्रयत्नात आता भारतातील एक महत्त्वाचे देवस्थान सहभागी झाले आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांमध्ये समावेश असलेल्या तिरुपती देवस्थानला एमईआयएल ग्रुपकडून (Megha Engineering & Infrastructure Limited Group : MEIL Group) दहा इलेक्ट्रिक बस दक्षिणा म्हणून मिळाल्या आहेत. या बस मंदिर परिसरात भाविकांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातील. 

इलेक्ट्रिक बसचा वापर केल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास तसेच इंधनाच्या खर्चात कपात होण्यास मदत होईल. दक्षिणा म्हणून मिळालेल्या बस स्वीकारून तिरुमला तिरुपती देवस्थानने बसच्या वापराचे नियोजन तातडीने सुरू केले आहे.

तिरुपती मंदिर हे भारतातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला डोंगरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना तिरुमला घाट पार करावा लागतो. नवसाला पावणारा देव अशी ख्याती असल्यामुळे तिरुपती बालाजी या मंदिरात दररोज सुमारे 50 हजार भाविक येतात. या भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान प्रशासनाने मंदिर परिसरात अनेक आधुनिक सोयीसुविधा केल्या आहेत. या सोयीसुविधांमध्ये आता इलेक्ट्रिक बस या सुविधेचा समावेश झाला आहे. 

परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी करा हे उपाय

टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल

बेलपत्र खाण्याचे फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी