World's Costliest Car : तब्बल 1100 कोटींना विकली गेली जगातील सर्वात महागडी कार, 'मर्सिडीज-बेंझ 300 SLR', 84 जणांचा घेतला होता जीव...

Mercedes-Benz 300 SLR : मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचा विक्रमी किंमतीत लिलाव करण्यात आला आहे. या लिलावाने फेरारी 250 जीटीओचा लिलाव विक्रम मोडला. जी 7 कोटी डॉलरला ( 542 कोटी रुपये) विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. इंग्लंडमधील Hagerty या वेबसाइटनुसार, जर्मन कार मर्सिडीज-बेंझ 300 SLR(Mercedes-Benz 300 SLR) रेसिंग कार 14.2 कोटी डॉलर (जवळपास 1100 कोटी रुपये) मध्ये विकली गेली आहे. Mercedes-Benz 300 SLR Uhlenhaut Coup च्या नावावर हा विक्रम झाला असून जी 14.3 कोटी डॉलर्सला विकली गेली आहे.

Mercedes-Benz 300 SLR
मर्सिडीज-बेंझ 300 SLR 
थोडं पण कामाचं
  • मर्सिडीज बेन्झचे एक मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक महागडी कार
  • मर्सिडीज-बेंझ 300 SLR ची तब्बल 1100 कोटी रुपयांना विक्री
  • मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचे फक्त दोन मॉडेल 1950 मध्ये बनवले गेले होते

Mercedes-Benz 300 SLR : नवी दिल्ली : मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचा विक्रमी किंमतीत लिलाव करण्यात आला आहे. या लिलावाने फेरारी 250 जीटीओचा लिलाव विक्रम मोडला. जी 7 कोटी डॉलरला  ( 542 कोटी रुपये)  विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. इंग्लंडमधील  Hagerty या वेबसाइटनुसार, जर्मन कार मर्सिडीज-बेंझ 300 SLR(Mercedes-Benz 300 SLR)  रेसिंग कार 14.2 कोटी डॉलर (जवळपास 1100 कोटी रुपये) मध्ये विकली गेली आहे. Mercedes-Benz 300 SLR Uhlenhaut Coup च्या नावावर हा विक्रम झाला असून जी 14.3 कोटी डॉलर्सला विकली गेली आहे. लिलाव गृहाने दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीतील स्टुटगार्ट येथील मर्सिडीज-बेंझ म्युझियममध्ये ५ मे रोजी लिलाव झाला. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी कार (Costliest Car)ठरली आहे. मर्सिडिज बेन्झच्या या रेसिंग कराबद्दलची रंजक माहिती जाणून घेऊया.(Mercedes-Benz 300 SLR becomes the costliest car in the world, sold for $70 million)

अधिक वाचा : World’s biggest SUV | बेडरुम आणि बाथरुम असलेली जगातील सर्वात मोठी, विशालकाय SUV, पाहा व्हिडिओ...

या कारने घेतला 84 जणांचा जीव

कंपनीने 1955 मध्ये कारची शर्यत सोडल्यानंतर या दोन हार्डटॉप प्रकारांची निर्मिती केली. यात 3.0-लिटर इंजिन आहे, ज्याची शक्ती 302 PS आहे. ही रेसिंग कार रेसिंग ट्रॅकवर उतरली होती, अशाच एका रेसिंगमध्ये 83 लोकांचा मृत्यू झाला होता. 1954 मध्ये या कारने 12 पैकी 9 रेस जिंकून शर्यत जिंकली होती. 1955 च्या ले मॅन्स रेस अपघातात कारने ड्रायव्हर पियरे लेवेघ आणि 83 प्रेक्षक मारले होते.

अधिक वाचा : world's longest car | भन्नाट! जलतरण तलाव आणि हेलिपॅड असलेली जगातील सर्वात लांब कार, पाहा तुफान सुविधा

त्यामुळे ही कार खास आहे

लिलाव करणाऱ्या कंपनीने दिलेली माहिती जर खरी असेल तर ही जगातील सर्वात महागडी कार असेल. तुमच्या माहितीसाठी फेरारी 250 जीटीओ 7 कोटी (542 कोटी रुपये) मध्ये विकली गेली होती. या किंमतीत सुमारे 20 कार खरेदी करता येतील. मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचे फक्त दोन मॉडेल 1950 मध्ये बनवले गेले होते, त्यानंतर मर्सिडीजने 1955 मध्ये रेसिंग बंद केली. हॅगर्टीच्या मते, मर्सिडीज-बेंझच्या वतीने गुप्त लिलाव करण्यात आल्याचे समजते. या लिलावात 10 मोठ्या कंपन्यांनी भाग घेतला होता. जर्मन कार निर्मात्या कंपनीने लिलाव प्रक्रियेत कठोर नियम लागू केले होते.

तुमच्या माहितीसाठी, हे वाहन मागील रेकॉर्डच्या जवळपास तिप्पट विकले गेले होते, जिथे 2018 मध्ये 1962 फेरारी 250 GTO चा लिलाव 4.8 कोटी डॉलरमध्ये झाला होता.

अधिक वाचा : Best Selling Car | मारुती वॅगनआरने ह्युंदाई आणि टाटासह सर्व कंपन्यांना टाकले मागे, झाली सर्वाधिक विक्री, पाहा टॉप 20 कार

एसयुव्ही (SUV) हा अलीकडच्या काळात अत्यंत लोकप्रिय झालेला वाहन प्रकार आहे. उत्पादनाच्या काळापासून, हमर एसयूव्ही (Hummer SUV) अनेक मार्गांनी वापरल्या जात आहेत. या एसयुव्ही अमेरिकन सैन्याने खडतर भूभागासाठी वापरल्या आहेत. त्याचबरोबर त्या लिमोझिन तयार करण्यासाठी वापरले गेल्या आहेत. इतरही अनेक गोष्टीसाठी हमर एसयूव्हींचा वापर करण्यात आला आहे. आता काही उत्साही लोकांनी जगातील सर्वात मोठा हमर तयार करून एक पाऊल पुढे टाकले आहे. हमरचा वापर करून जगातील सर्वात मोठी एसयुव्ही बनवण्यात आली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी