मुंबई: मागील वर्ष भारतातील कार उत्पादकांसाठी कठीण होते. मर्सिडीज बेंझदेखील (Mercedes-Benz) त्याला अपवाद नव्हता. जर्मन लक्झरी कार कंपनीने गेल्या महिन्यात भारतात 7,893 मोटारींची विक्री केली. जे 2019 च्या तुलनेत 42.75% कमी आहे. 20202 च्या उत्तरार्धात त्यांच्या वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. 2019 च्या तुलनेत विक्रीत 40 टक्के वाढ झाली आहे. मागील सहा वर्षांपासून भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या लक्झरी कार उत्पादक कंपनीची स्थिती कायम राखण्यासाठी या कार उत्पादक कंपनीने यंदा भारतात नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यासाठी यावर्षी एकूण 15 नवीन उत्पादने बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यातील बरीचशी पहिल्यांदाच लाँच केले जाणार आहेत.
यावर्षी भारतात नवीन ए-क्लास लिमोझिन (A-Class Limousine) आणि नवीन जनरेशन जीएलए अशा कार लाँच करणार असल्याचे मर्सिडीज बेंझ यांनी नमूद केले आहे. याव्यतिरिक्त, लक्झरी कार निर्माता 2021 मध्ये एएमजी जीटी ब्लॅक सीरिज देखील आणेल. एएमजी जीटी ब्लॅक सीरिजने नुकताच नॉर्डस्लाफ नुर्बर्गरिंगच्या आसपास वेगवान उत्पादन कारचा विक्रम नोंदविला आहे. यात ४.० लिटरचे व्ही V8 इंजिन दिले गेले आहे. जे 720 बीएचपी आणि ८०० एनएमची पीक टॉर्क देते ज्यामुळे ते सर्वात शक्तिशाली एएमजी व्ही8 इंजिन बनते. पॉवरप्लांटमध्ये सात-स्पीड एएमजी स्पीडशिफ्ट ड्युअल-क्लच गिअरबॉक्स देण्यात आला आहे. जो स्पोर्ट्स कारला ३.२ सेंकदात 100 किमी/तासापर्यंत आणि 325 किमी/तासाचा वेग गती मिळविण्यास मदत करतो. या बरोबरच, या वर्षी भारतात सुरू करण्यात आलेल्या इतर मर्सिडीज बेंझ कारमध्ये नवीन E-Class आणि नुकत्याच सादर झालेल्या नवीन जनरेशनच्या S-Class सेडानचा समावेश आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेनक म्हणाले की, 'आम्ही आशावादी आहोत पण साथीच्या रोगामुळे बाजारपेठेत मोठी घसरण झालेली आहे. मात्र तरीही आम्ही विक्रीची गती कायम ठेवण्याबाबत आश्वस्त आहोत. मर्सिडीज-बेंझ इंडिया सावधगिरीने आशावादी आहे आणि आम्ही 15 नवीन कार बाजारात आणणार आहोत. 2021 हे वर्ष संपूर्ण उत्पादनाचे वर्ष असेल, आम्हाला विश्वास आहे की ग्राहक आणि आमच्या व्यापारी भागीदारांना ज्यामुळे उत्तेजन मिळेल.'