Mercedes-Benz: मेक इन इंडिया अंतर्गत मर्सिडीज बेंझ भारतात तयार करणार एएमजी कार

जर्मनीची लक्झरी कार बनविणारी कंपनी मर्सिडीज-बेंझ यांनी सांगितले की, ते स्थानिक पातळीवर भारतात एएमजी असेंब्ल करेल.

car
मर्सिडीज बेंझ भारतात तयार करणार एएमजी कार  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: जर्मन लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज बेंझ (mercedes benz) मंगळवारी (20 ऑक्टोबर) म्हणाले की, भारतात कार सीरीज एएमजीच्या स्थानिक स्तरावर असेंब्ल करणं सुरू केलं आहे. कंपनीच्या एका निवेदनात म्हटलं आहे की, मर्सडिज-बेंजच्या पुण्यातील चाकण येथे मर्सिडीज बेंझच्या प्रॉडक्शन प्लांटमध्ये तयार होणारे पहिले उत्पादन एएमजी जीएलसी 43 4 मॅटिक कूप असेल असे म्हटले आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेनक म्हणाले की, स्थानिक पातळीवर एएमजीचं उत्पादन तयार करण्याच्या निर्णयाने मर्सिडीज-बेंझ यांच्या भारतीय बाजारपेठेसाठी दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित केली आहे. ते म्हणाले की, एएमजी सहज उपलब्ध व्हावे अशी कंपनीची इच्छा आहे.

एएमजी ब्रँड वर्षानुवर्षे भारतात खूप लोकप्रिय झाला आहे. कंपनीला विश्वास आहे की, स्थानिक पातळीवर उत्पादित एएमजी जीएलसी 43 4 मॅटिक कूपे आणल्यामुळे उत्पादनाला चांगली किंमत मिळेल आणि याची मागणी वाढेल.

या कारची एक्स शोरूम किंमत ही 75 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. मर्सडीज बेंज च्या या नव्या कारमध्ये 3.0 लिटर V6 biturbo इंजिन देण्यात आलं आहे. हे 287 किलोवॅट (390 हॉर्सपावर) जनरेट करते. ही कार 4.7 सेकंदांत शून्यापासून ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडते.

Mercedes-AMG C43 4MATIC Coupe या कारला नवं स्टेअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कारमध्ये 10.25 इंचाचा हाय रिझॉल्युशन मीडिया डिस्प्ले स्क्रिन देण्यात आली आहे. ही कार म्हणजे कंपनीची या वर्षातील देशातील दुसरी कार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात कंपनीने व्ही-क्लास बाजारात लॉन्च केली होती. कंपनीची योजना आहे की, या वर्षी 10 नव्या गाड्या बाजारात लॉन्च करण्यात याव्यात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी