Mercedes-Benz ची शानदार इलेक्ट्रिक कार EQA लाँचिंगसाठी तयार 

Mercedes-Benz EQA: मर्सिडीज-बेंज इलेक्ट्रिक EQA ही कार लवकरच लाँच करणार आहे. या कारचा वर्ल्ड प्रीमियर २० जानेवरी २०२१ रोजी आहे. जाणून घ्या या कारबाबत काही खास गोष्टी

Mercedes-Benz EQA
Mercedes-Benz ची शानदार इलेक्ट्रिक कार EQA लाँचिंगसाठी तयार   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: मर्सिडीज-बेंज इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने वेगाने पावलं टाकत आहे. असं यावरुन म्हटलं जात आहे की, जर्मन लक्जरी कार कपंनीने इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. EQC नंतर कार कंपनीच्या लाइनअपमध्ये समावेश होणारी पुढील इलेक्ट्रिक कार EQA असणार आहे. ज्याचं आज (20 जानेवारी 2021) वर्ल्ड प्रीमियर आहे. ही आगामी इलेक्ट्रिक कार या मार्च महिन्यापर्यंत यूरोपमध्ये उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. EQA नंतर कार कंपनी  EQB देखील  या वर्षाच्या शेवटी लाँच करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कार कंपनीने फ्रँकफर्ट मोटर शो 2017 मध्ये एक कॉन्सेप्ट कार म्हणून प्रदर्शित केली होती. त्यावेळी, पूर्वावलोकन केलेली कार तीन-दरवाजे इलेक्ट्रिक कार होती. तर उत्पादन मॉडेलमध्ये ही 5 दरवाजे असणारी कार असेल. या कारचं प्रोटोटाइप अनेकदा पाहिले गेले आहे. ही कार मर्सिडीज GLA क्लाससारखीच आहे. पण याच्या फीचरमध्ये सील-ऑफ ग्रिल आणि नो एक्जॉस्ट सेट-अप यासारखे यूनिक एलिमेंट असणार आहेत. 

EQC प्रमाणेच मर्सिडीज-बेंज EQA किमान क्रीज आणि एक राउंड ऑफ प्रोफाइलला सपोर्ट करेल. ही इलेक्ट्रिक कार आपल्या कॉन्सेप्ट डिझाईनच्या अगदीच जवळपास जाणारी आहे. यामध्ये एक नॅरो विंडो लाइन, एक स्लोप रूफ लाइन आणि रॅप-अराउंड टेल लाइट्स असणार आहे, जी एका एलईडी पट्टीला जोडलेली असेल. एक अन्य डिजाइन एलिमेंट जे आपण  प्रोडक्शन मॉडल म्हणून पाहणं पसंत करु, ते आहे ग्रील, बम्पर आणि बाजूला एक एलईडी आर्क. कारच्या आत एक मोठी टचस्क्रीनप्रमाणे गॅजेटरी असणार आहे, ज्यामध्ये MBUX सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनलसह असणार आहे.

कार निर्मात्यांनी आतापर्यंत EQA च्या टेक्निकल डिटेल्सबाबत खुलासा केलेला नाही. पण याकडे लक्ष दिले आहे की,  EQA 188 बीएचपीच्या आउटपुटसह येईल. पण नंतरच्या टप्प्यात 268 bhp व्हेरिएंटला जोडले जाण्याची शक्यता आहे. नंतर समान पॉवरट्रेनची सुविधा असेल जी कॉन्सेप्ट मॉडलमध्ये उपलब्ध होती आणि 400 किमी/चार्ज की ड्रायव्हिंग रेंजचा दावा करण्या आला होता. मर्सिडीज-बेंज EQA एक मानक म्हणून ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमसह येईल आणि यात दोन ड्रायव्हिंग मोड स्पोर्ट आणि स्पोर्ट प्लस यांचा समावेश असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी