येत आहे देशातली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार

भ्रूममभ्रूमम
Updated Mar 17, 2023 | 15:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

MG Comet Electric एम जी ची बहुप्रतीक्षित कॉमेट ईवी एप्रिल २०२३ मध्ये भारतात लॉंच केली जाणार आहे. एमजी मोटर इंडियाच्या नव्या अधिकृत छायाचित्राद्वारे हे नवे मॉडेल ईवी 2 डोअर सेट अप सोबत येणार असल्याचे कळते. मात्र ही कार अवघी २.९ मीटर लांबी असून भारतीय बाजारामध्ये ती सर्वात छोटी कार असणार आहे.

small car
लांबीनुसार कॉमेट ईवी टाटा नॅनो हून छोटी आहे.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक वेहिकल्स (जीएसईवी) प्लेटफॉर्म वर डिजाईन केली जाणार आहे
  • सिंगल चार्ज वर ३०० किमी ची रेंज मिळणार
  • एमजी चे हे 2 डोअर मॉडल, फीचर्सच्या बाबतीत बड्या गाड्यांना देणार टक्कर !

MG Comet to launch next month most affordable EV : नवी दिल्ली:  एम जी ची बहुप्रतीक्षित कॉमेट ईवी एप्रिल २०२३ मध्ये भारतात लॉंच केली जाणार आहे. एमजी मोटर इंडियाच्या नव्या अधिकृत छायाचित्राद्वारे हे नवे मॉडेल ईवी 2 डोअर सेट अप सोबत येणार असल्याचे कळते. मात्र ही कार अवघी २.९ मीटर लांबीची असून भारतीय बाजारामध्ये ती सर्वात छोटी कार असणार आहे.

हे पण वाचा Farmers Protest March: लाल वादळ मुंबईत धडकणार की परतणार? सरकार आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा, पण...

या कार चे आकारमान पाहता कॉमेट ईवी टाटा नॅनो हून छोटी आहे. या नव्या मॉडल ची किंमत १० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. भारतीय मोटर बाजारात या कारची स्पर्धा TaTa Tiago EV आणि Citroen eC3 सोबत असेल.

एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक वेहिकल्स (जीएसईवी) प्लेटफॉर्म वर डिजाईन केली जाणार आहे. ही एक लांब आणि चौकोनाकृती कॉम्पेक्ट कार आहे. कॉमेट ईवी चे मॉडल इंडोनेशियाच्या वुलिंग एयर ईवी कार सारखे आहे. तसेच याचे चार्जिंग पोर्ट MG GS EV प्रमाणे फेशियाच्या मध्यभागी आहे.

हे पण वाचा Toyota Innova Crysta: नवी टोयोटा इनोवा Crysta डिझेल इंजिनसह लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स...

कारचे स्वरूप कसे असेल?

समोरील बाजूस कॉमेट इलेक्ट्रिक वेहिकल्सला डयूअल, उभे स्टेक केलेले हेंडलॅम्प आहेत. तसेच टर्न इंडिकेटर्स सोबत दोन एलइडी डेटाइम रनिंग लॅम्प आणि डयूअल-टोन फ्रंट बंपरचा समावेश आहे. कंपनीने या कारची डिजाइन्स प्रसिद्ध केली असून, हे मॉडल डयूअल टोन कलर थीममध्ये असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी