MG Hector गाडीला जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 23 दिवसांत 10 हजार गाड्यांचं बुकिंग

भ्रूममभ्रूमम
Updated Jul 01, 2019 | 19:10 IST | टाइम्स नाऊ हिंदी

MG Hector Booking: एमजी मोटरने भारतीय बाजारपेठेत आपली एसयूव्ही हेक्टर (Hector) लॉन्च केली आहे. या गाडीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. या कारची वेटिंग चार महिन्यापर्यंत पोहोचली आहे.

MG Hector
MG Hector 

नवी दिल्ली: दिर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर एमजी मोटरने भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. या सोबतच कंपनीने आपली दमदार एसयूव्ही एमजी हेक्टर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने ही गाडी 12.18 लाख रुपयांत (एक्स शोरूम किंमत) लॉन्च केली आहे. ही कार पेट्रोल, पेट्रोल मिल्ड हायब्रिड, डिझेल इंजिन व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीत मॅन्युअल ट्रान्समिशन, डीसीटी ऑटोमेटिक गिअरबॉक्सचे पर्याय देण्यात आले आहेत.

एमजी कंपनीने सांगितले की, हेक्टर या एसयूव्हीला अवघ्या 23 दिवसांत 10 हजार गाड्यांचं बुकिंग मिळालं आहे. कंपनीतर्फे या कारसाठी प्रीबुकिंग गेल्या महिन्यात 4 जून रोजी सुरू केलं होतं. सर्वात खास बाब म्हणजे या सेगमेंटमध्ये 50 टक्क्यांहून अधिक बुकिंग हे एसयूव्हीच्या पेट्रोल व्हेरिएंटला मिळत आहे. 

एमजी मोटरने अधिकृतरित्या सांगितले आहे की, पेट्रोल व्हेरिएंटला डिझेल व्हेरिएंटपेक्षा अधिक पसंती मिळत आहे. केवळ दिल्ली एनसीआरमध्येच नाही तर देशाच्या इतर शहरांमध्येही या व्हेरिएंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने सांगितले की, 50 टक्के बुकिंगपैकी 70 टक्के बुकिंग डीटीसी ऑटोमेटिक व्हेरिएंटला मिळली आहे. तर, कारच्या हायब्रिड व्हेरिएंटला सुद्धा 15 टक्के बुकिंग मिळत आहे.

Mg Hector iSMART connected system

एमजी हेक्टरचे चे चार व्हेरिएंट आहेत त्यामध्ये स्टाइल, सुपर, स्मार्ट आणि शार्प या व्हेरिएंटचा समावेश आहे. टॉप ट्रिम म्हणजेच शार्प व्हेरिएंटमध्ये एलईडी हेडलॅम्प, डीआरएल, ड्युअल टोन अॅलॉय व्हील, 10.4 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉईड अॅपल स्मार्टफोन कॉम्पेटिबिल्टी, आय स्मार्ट कनेक्टिविटी सूट, लेदर सीट कवर, पॅनोरेमिक सनरूफ, पावर्ड ड्राइव आणि त्यासोबतच इतरही अनेक फीचर्सचा समावेश आहे.

MG Hector

75 टक्के प्रीबुकिंग हे एमजी हेक्टरच्या टॉप दोन व्हेरिएंट्सला मिळाली आहे. मात्र, ही कार मिळवण्यासाठी ग्राहकांना आणखीन काही काळ वाट पहावी लागणार आहे. एमजी मोटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव छाबा यांनी सांगितले की, 'पुढील दोन ते तीन महिने आम्ही कारच्या 2 हजार यूनिट्सचं पोडक्शन करु'. कारच्या ऑटोमेटिक व्हेरिएंटचा वेटिंग कालावधी हा चार महिन्यांचा आहे. तर, मॅन्युअल व्हेरिएंटसाठी एका महिन्याचं वेटिंग सुरू आहे. कंपनीच्या मते, हेक्टर एसयूव्हीची डीलिव्हरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
MG Hector गाडीला जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 23 दिवसांत 10 हजार गाड्यांचं बुकिंग Description: MG Hector Booking: एमजी मोटरने भारतीय बाजारपेठेत आपली एसयूव्ही हेक्टर (Hector) लॉन्च केली आहे. या गाडीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. या कारची वेटिंग चार महिन्यापर्यंत पोहोचली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola