दमदार MG Hector लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

भ्रूममभ्रूमम
Updated Jun 28, 2019 | 12:57 IST | टाइम्स नाऊ हिंदी

MG Hector Launch: एमजी हेक्टर अखेर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे आणि यासोबतच या गाडीची किंमत आणि फिचर्सचा सुद्धा खुलासा झाला आहे. ही गाडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. जाणून घ्या किंमत...

MG Hector
MG Hector 

मुंबई: भारतीय बाजारात आणखीन एका दमदार एसयूव्हीची एन्ट्री झाली आहे. मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजी मोटरची हेक्टर (MG Hector) भारतात लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या गाडीची झलक यापूर्वीच दाखवली होती मात्र, आता ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. एमजी हेक्टर या एसयूव्हीची एक्स शो रूम किंमत 12.19 लाख रुपयांपासून 16.88 लाख रुपये यांच्या दरम्यान आहे. ही गाडी तुम्ही एमजी शील्ड ओनरशिपमधून खरेदी करु शकता.

एमजी हेक्टर तुम्हाला 4 व्हेरिएंट आणि 11 पर्यायांसोबत उपलब्ध आहे. या गाडीत तुम्हाला पेट्रोल, पेट्रोल हायब्रिड आणि डिझेल हे तीन इंजिनाचे पर्याय मिळतात. पेट्रोल व्हेरिएंट मॅन्युअल आणि ऑटोमेटिक या दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. हेक्टर गाडीत तुम्हाला 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं जे 250 Nm च्या टॉर्कवर 143 पीएस पावर जनरेट करतं. तर कारचं 2.0 लिटरचं टर्बोचार्ड डिझेल इंजिन 350 Nm च्या टॉर्कवर 170 पीएसची पावर जनरेट करतं. कंपनीने दावा केला आहे की, एआरएआयच्या मते कारचं मायलेज हे पेट्रोल व्हेरिएंटसाठी 15.81 किलोमीटर प्रति लिटर आणि डिझेल व्हेरिएंटचा मायलेज 17.41 किलोमीटर प्रति लिटर इतका आहे. 

एमजी हेक्टरच्या सर्व व्हेरिएंटची किंमत

एमजी हेक्टरची सुरुवाती किंमत 12.18 लाख रुपये (नवी दिल्लीतील एक्स शोरूम किंमत) आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन, स्टाईल व्हेरिएंट 12.18 लाख रुपये इतकी आहे. तर पेट्रोल मॅन्युअल सुपर व्हेरिएंटची किंमत 12.98 लाख रुपये इतकी आहे. कारच्या पेट्रोलच्या हायब्रिड मॅन्युअलच्या सुपर व्हेरिएंटची किंमत 13.58 लाख रुपये, स्मार्ट व्हेरिएंट 14.68 लाख रुपये आणि शार्प व्हेरिएंटची किंमत 15.88 लाख रुपये आहे.

MG Hector

पेट्रोल डीसीटीच्या स्मार्ट व्हेरिएंचची किंमत 15.28 लाख रुपये, शार्प व्हेरिएंटची किंमत 16.78 लाख रुपये आहे. डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनच्या स्टाइल व्हेरिएंटची किंमत 13.18 लाख रुपये, सुपर व्हेरिएंटची किंमत 14.18 लाख रुपये, स्मार्ट व्हेरिएंटची किंमत 15.48 लाख रुपये आणि शार्प व्हेरिएंटची किंमत 16.88 लाख रुपये इतकी आहे. या सर्व किमती नवी दिल्लीतील एक्स शोरूमच्या आहेत.

Mg Hector iSMART connected system

या कारमध्ये 10.4 इंचाची मोठी एचडी टचस्क्रीन देण्यात आली होती ज्यामध्ये आय स्मार्ट फीचर देण्यात आलं आहे. कारमध्ये तुम्हाला अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले या दोन्ही कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळतो. यासोबतच कारमध्ये एलईडी डीआरएल, पॅनोरेमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, क्रूज कंट्रोल, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फ्रंट सीट सारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दमदार MG Hector लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स Description: MG Hector Launch: एमजी हेक्टर अखेर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे आणि यासोबतच या गाडीची किंमत आणि फिचर्सचा सुद्धा खुलासा झाला आहे. ही गाडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. जाणून घ्या किंमत...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola