New Electric Car : इलेक्ट्रिक कार घेण्याच्या विचारात आहात, मग येते ही नवी छोटी ई-कार, कमी किंमतीत दमदार वैशिष्ट्ये

MG Motors electric car : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles)बाजारपेठ वेगाने विस्तारते आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक श्रेणीतील आपली मॉडेल बाजारात लॉंच करत आहेत. आता एमजी मोटर्सदेखील (MG) यासाठी सज्ज झाली आहे. एमजी मोटर्सची भारतीय बाजारपेठेतील उपस्थिती आधीपासूनच आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत विस्तार करणार आहे. एमजी मोटर्स लवकरच एक मिनी इलेक्ट्रिक कन्वर्टिबल कार (Mini Electric Convertible Car) लॉन्च करणार आहे. ही ई-कार फक्त 3 मीटर लांब असेल.

Electric Vehicles
इलेक्टिक कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक श्रेणीतील आपली मॉडेल बाजारात लॉंच करत आहेत
  • एमजी मोटर्स लवकरच एक मिनी इलेक्ट्रिक कन्वर्टिबल कार (Mini Electric Convertible Car) लॉन्च करणार आहे
  • ही कंपनीची एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार असेल

MG Electric Car : नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles)बाजारपेठ वेगाने विस्तारते आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक श्रेणीतील आपली मॉडेल बाजारात लॉंच करत आहेत. आता एमजी मोटर्सदेखील (MG) यासाठी सज्ज झाली आहे. एमजी मोटर्सची भारतीय बाजारपेठेतील उपस्थिती आधीपासूनच आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत विस्तार करणार आहे. एमजी मोटर्स लवकरच एक मिनी इलेक्ट्रिक कन्वर्टिबल कार (Mini Electric Convertible Car) लॉन्च करणार आहे. ही ई-कार फक्त 3 मीटर लांब असेल. चाचणी दरम्यान ही कार दिसली आहे. ही कंपनीची एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार असेल असे मानले जात आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत हे भारतीय बाजारात लॉन्च केले जाऊ शकते. MG ची ही इलेक्ट्रिक कार Wuling Air EV वर आधारित असेल. याला E230 म्हणूनही ओळखले जाते. या कारला यावर्षी इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आले आहे. भारतीय स्थितीनुसार याच्या मॉडेलमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. (MG Motors to launch new Electric Convertible Car in Indian market)

अधिक वाचा : Signs of High Diabetes:ही आहेत वाढलेल्या मधुमेहाची लक्षणे...दुर्लक्ष करणे पडेल महागात, जाणून घ्या

एमजी मिनी इलेक्ट्रिक कारची (MG Electric Car) वैशिष्ट्ये

MG ने जाहीर केले आहे की ते चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भारतात नवीन एंट्री-लेव्हल EV आणेल. नवीन मॉडेल विशेषत: गजबजलेल्या शहरी भागांसाठी तयार करण्यात आले आहे. त्याची बॅटरी स्थानिक स्थितीनुसार तयार केली जाईल. इलेक्ट्रिक कार मोठ्या टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि अनेक हाय-एंड वैशिष्ट्यांसह येईल. विशेष म्हणजे त्याची लांबी फक्त 2.9 मीटर असेल. म्हणजेच ती मारुतीच्या अल्टो की पेक्षा लहान असेल.

अधिक वाचा : Weight Loss Diet : वजन कमी करण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी खायचे पाच पदार्थ

एमजी मिनी इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये आणि किंमत

एमजी मिनी इलेक्ट्रिक कारचा व्हीलबेस 2010 मिमी असेल. त्याच्या इंडोनेशियन मॉडेलमध्ये 12-इंच स्टीलची चाके आहेत. मात्र, EV च्या भारतीय मॉडेलमध्ये अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. त्याचे अलीकडे स्पॉट केलेले मॉडेल हे डाव्या हाताने चालणारे वाहन आहे. याला टेलगेटवर एक चाक देखील बसवले आहे, जे जागतिक मॉडेलमध्ये उपलब्ध नाही. या कारमध्ये 20kWh ते 25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. पूर्ण चार्ज केल्यावर, ते 150 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 10 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

अधिक वाचा : Orange Juice: सकाळी-सकाळी प्या संत्र्याचा ज्यूस; होतील कमालीचे फायदे; आजच करा आहारात समावेश

इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीने चांगलीच गती पकडली आहे. सर्वच वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicle)लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक इलेक्ट्रिक कारची मॉडेल बाजारात येत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीचा परिणाम केवळ देशातच नाही तर परदेशातही कार विक्रीच्या आकडेवारीवर दिसून येऊ लागला आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कार उत्पादकांनी मागील काही कालावधीत भारतात अनेक इलेक्ट्रिक कार लॉंच केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी