New Audi Q5 ऑडी इंडियाकडून ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू

जर्मनीतील आलीशान कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू केले.

New Audi Q5 Bookings Open In India
ऑडी इंडियाकडून ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू 
थोडं पण कामाचं
  • ऑडी इंडियाकडून ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू
  • नवी सुधारित क्यू ५ स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल
  • ऑडी क्यू २ लाख रुपये भरून बुक करता येणार आहे

मुंबईः जर्मनीतील आलीशान कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू केले. नवी सुधारित क्यू ५ स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल. त्याला इन्फोटेनमेंटचे अफाट पर्याय आणि मदतनीस विकल्पांची (असिस्टन्स) उत्तम जोड मिळेल. ऑडी क्यू ५ ही आकार, अजोड कामगिरी आणि उपकरण सुसज्जतेच्या परिपूर्ण मिलापासाठी ओळखली जाते. या अतिशय यशस्वी मॉडेलचे तेजतर्रार एक्सटेरिअर डिझाइन तिची Q ओळख तसेच क्वॉट्रो डीएनएला अधोरेखित करते. ऑडी क्यू २ लाख रुपये (भारतीय रुपये) भरून बुक करता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग अधिकृत वेबसाइट (www.audi.in) वर तसेच ऑडी इंडिया डीलरशीपद्वारेही करता येईल. New Audi Q5 Bookings Open In India

ऑडी इंडियाचे प्रमुख श्रीयुत बलबीरसिंह धिल्लन म्हणाले, “भारतातील ऑडीच्या क्यू परिवारात आम्ही आज ऑडी क्यू ५ ची भर घालत तिची बुकिंगही सुरू केली आहे. २०२१ वर्षातील हे आमचे नववे प्रॉडक्ट लाँचिंग आहे. ऑडी क्यू ५ ही आपल्या श्रेणीत अत्याधुनिक वैशिष्ट्ये, आराम आणि व्यवहार्यता यांचा परिपूर्ण संगम आहे. अगदी पहिल्याच नजरेत ऑडी क्यू ५ चे नवे डिझाइन भुरळ पाडते. या श्रेणीतील धुरंधर म्हणून आम्ही आमचे स्थान बळकट राखू,असा आम्हाला विश्वास आहे. यासोबतच आम्ही आमच्या सध्याच्या व नव्या ग्राहकांनाही आकर्षित करू शकू."

लोभस डिझाइनयुक्त ही नवी ऑडी क्यू ५ वाहन चालवण्याच्या आपल्या क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह गुणधर्मांसोबत येते, जिला या श्रेणीतील सर्वोत्तम गतिशीलतेचे भरभक्कम पाठबळ आहे. ऑडी क्यू ५ ४८.२६ सेंटीमीटर (आर १९) ५ डबल स्पोक स्टार स्टाइल अलॉय व्हील्स, ऑडी पार्क असिस्ट, कम्फर्ट की सेन्सर नियंत्रित बूट लिडची उघडझाप, एकमेव ऑडीतच उपलब्ध लाखेपासून निर्मित ब्लॅक पियानो इनलेज, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, बीअँडओ प्रीमियम थ्रीडी साऊंड सिस्टिम आदी वैशिष्ट्ये व सुविधांचा अंतर्भाव आहे.

ऑडी क्यू ५ ही चारही चाकांसाठी डॅम्पिंग नियंत्रित सस्पेन्शनने सुसज्ज आहे. आपल्या २.० लिटरच्या शक्तिशाली टीएफएसआय इंजिनच्या माध्यमातून ऑडी क्यू ५ प्रभावी ऍक्सिलरेशन आणि चपळता दाखवते. तसेच त्यातील क्वॉट्रो ऑल-ड्राइव्ह यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर अनन्यसाधारण गती आणि दिशात्मक स्थैर्यता आणते. यात सुरक्षितता वाढवण्यासाठी मागील बाजूस २ एअरबॅग्जचाही अंतर्भावासह एकूण ८ एअरबॅग्जचा समावेश करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी