New electric car : या नव्या इलेक्ट्रिक कारने घातला धुमाकूळ, 610 किमीची रेंज, काही तासांतच हजारो कारचे बुकिंग

Electric Car : इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीने चांगलीच गती पकडली आहे. सर्वच वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicle)लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक इलेक्ट्रिक कारची मॉडेल बाजारात येत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीचा परिणाम केवळ देशातच नाही तर परदेशातही कार विक्रीच्या आकडेवारीवर दिसून येऊ लागला आहे. ह्युंदाई इलेक्ट्रिक कारला ( Hyundai electric car)ग्राहकांकडून इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे की हजारो कारची काही तासांतच प्री-बुकिंग झाल्या आहेत.

Hyundai electric car
ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक कार  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • अलीकडच्या काळात अनेक इलेक्ट्रिक कारची मॉडेल बाजारात येत आहेत.
  • ह्युंदाई इलेक्ट्रिक कारला ( Hyundai electric car)ग्राहकांकडून इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला
  • प्री-ऑर्डरच्या बाबतीत ह्युंदाईच्या नव्या इलेक्ट्रिक कारने Kia EV6 ला मागे टाकले आहे.

Hyundai electric car Pre booking Record : नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीने चांगलीच गती पकडली आहे. सर्वच वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicle)लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक इलेक्ट्रिक कारची मॉडेल बाजारात येत आहेत.
इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीचा परिणाम केवळ देशातच नाही तर परदेशातही कार विक्रीच्या आकडेवारीवर दिसून येऊ लागला आहे. ह्युंदाई इलेक्ट्रिक कारला ( Hyundai electric car)ग्राहकांकडून इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे की हजारो कारची काही तासांतच प्री-बुकिंग झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या कारमध्ये तुम्हाला 610 किमी. ची रेंज मिळते. समोर आलेल्या माहितीनुसार, ह्युंदाईने दावा केला आहे की प्री-सेल्सच्या पहिल्याच दिवशी तिला नवीन Ioniq 6 इलेक्ट्रिक कारसाठी 37,446 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. प्री-ऑर्डरच्या बाबतीत ह्युंदाईच्या नव्या इलेक्ट्रिक कारने Kia EV6 ला मागे टाकले आहे. ही बाब दक्षिण कोरियाची असली तरी या प्री बुकिंगमुळे ह्युंदाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (New Hyundai electric car created Pre booking Record)

अधिक वाचा : Diabetes Diet Tips : चुकीचे पीठ खाल्ल्यानेही वाढू शकतो मधुमेह, जाणून घ्या कोणत्या पिठाची भाकरी असते फायदेशीर

ह्युंदाई Ioniq 6ची किंमत

या वर्षी जुलैमध्ये बुसान मोटर शोमध्ये Hyundai Ioniq 6 चे अनावरण करण्यात आले. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 39,000 डॉलर(सुमारे 31 लाख रुपये) आहे. ही इलेक्ट्रिक सेडान 53.0 kWh आणि 77.4 kWh या दोन बॅटरी आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. ह्युंदाईचा दावा आहे की कार पूर्ण चार्ज केल्यावर 610 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022 Ekdant Katha: गणपती बाप्पाला का म्हणतात एकदंत, जाणून घ्या या मागील कथा

ह्युंदाई Ioniq 6ची कारची वैशिष्ट्ये

कारमध्ये दोन ड्राईव्हट्रेनचे पर्याय देण्यात आले आहेत. एक मॉडेल सिंगल मोटर आणि रिअर-व्हील ड्राइव्ह सेटअपसह येते. तर दुसऱ्याला ड्युअल मोटर आणि ऑल-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन मिळते. टॉप मॉडेल 5.1 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. ही इलेक्ट्रिक कार फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते, ज्याच्या मदतीने ती केवळ 18 मिनिटांत 10-80 टक्के रिचार्ज केली जाऊ शकते.

अधिक वाचा : Best Prepaid Plan : फक्त 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये चालणार 180 दिवस, एअरटेल, जिओ, व्होडाफोन, बीएसएनल सर्वांवर भारी

या फेस्टिवल सीझनमध्ये (Festival Season) अनेक नवीन गाड्या ( New Car Launches)लॉन्च होणार आहेत. यापैकी बहुतेक नवीन कार दिवाळीच्या (Diwali)आसपास लॉन्च होणार आहेत. दिवाळीत आपल्याकडे काहीतरी नवीन खरेदी करण्याची परंपरा आहे. अनेकजण नवीन वाहन दसरा किंवा दिवाळीला खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तुमचाही असाच प्लॅन असेल तर यंदा अनेक नवीन पर्याय लवकरच बाजारात येणार आहेत. 

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) जमाना आला आहे. सर्वच आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या जगभरातून आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कार उत्पादकांनी मागील काही कालावधीत भारतात अनेक इलेक्ट्रिक कार लॉंच केल्या आहेत. आता मर्सिडिजनेदेखील (Mercedes-Benz) आपली एक भन्नाट इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत आणली आहे. मर्सिडिजची Mercedes-AMG EQS 53 4MATIC ही पूर्णपणे तयार कार भारतात आयात केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी