Nitin Gadkari: नितीन गडकरींनी हायड्रोजनवर चालणारी इलेक्ट्रिक गाडी केली लॉंच; जाणून घ्या Toyota Mirai ची वैशिष्ट्ये

भ्रूममभ्रूमम
Updated Mar 17, 2022 | 10:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Toyota Mirai | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ग्रीन हायड्रोजनवर आधारित असलेली मॉडर्न फ्युएल सेल एलेक्ट्रिक गाडी टोयोटा मिराई लॉंच केली आहे. यादरम्यान गडकरी म्हणाले की, भारतातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून देशात अशा वाहनांसाठी वातावरण निर्माण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

  Nitin Gadkari launches Toyota Mirai electric car powered by hydrogen
नितीन गडकरींनी हायड्रोजनवर चालणारी इलेक्ट्रिक गाडी केली लॉंच  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नितीन गडकरी यांनी बुधवारी ग्रीन हायड्रोजनवर आधारित असलेली मॉडर्न फ्युएल सेल एलेक्ट्रिक गाडी टोयोटा मिराई लॉंच केली.
  • टोयोटा मिराई ग्रीन हायड्रोजनपासून निर्माण होणाऱ्या विजेवर चालणारी गाडी आहे.
  • टोयोटा मिराई FCEV सेडानमध्ये एक हाय प्रेशर हायड्रोजन इंधन टाकी आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे.

Toyota Mirai | नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ग्रीन हायड्रोजनवर आधारित असलेली मॉडर्न फ्युएल सेल एलेक्ट्रिक गाडी (FCEV) टोयोटा मिराई लॉंच केली आहे. यादरम्यान गडकरी म्हणाले की, भारतातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून देशात अशा वाहनांसाठी वातावरण निर्माण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. (Nitin Gadkari launches Toyota Mirai electric car powered by hydrogen). 

अधिक वाचा : अन् पत्नी आणि प्रियकराने पतीचा असा केला गेम

गडकरींनी आणखी म्हटले की, हायड्रोजनवर चालणारे एफसीईव्ही हे शून्य-कार्बन उत्सर्जनासाठी चांगला पर्याय आहे. तसेच ते पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे आणि यामध्ये पाण्याशिवाय इतर कोणतेही उत्सर्जन होत नाही. 

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, ग्रीन हायड्रोजन अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून बनवता येते. लक्षणीय बाब म्हणजे गडकरी यावेळी आणखी म्हणाले की, ग्रीन हायड्रोजनच्या क्षमतेचा उपयोग करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास भारताला भविष्यात स्वच्छ किंवा किफायतशीर ऊर्जा मिळवण्यास मदत होईल. 

अधिक वाचा : प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार

दरम्यान, टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) संयुक्तपणे एक पायलट प्रोजेक्ट चालवत आहे, ज्याचा उद्देश जगातील सर्वात प्रगत FCEV टोयोटा मिराईचा भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितींवर अभ्यास करणे आहे.

लक्षणीय बाब म्हणजे टोयोटा मिराई लॉन्च करताना या कार्यक्रमात नितीन गडकरींव्यतिरिक्त, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय मंत्री आरके सिंग आणि अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

अधिक वाचा : किंमत मिळत नसल्यानं राजू शेट्टी सरकारला धक्का देणार?

६४६ किमी पर्यंतची आहे रेंज

टोयोटा मिराई ग्रीन हायड्रोजनपासून निर्माण होणाऱ्या विजेवर चालणारी गाडी आहे. ही कार पाच मिनिटांच्या इंधन भरण्याच्या वेळेसह असा दावा केला जातो की, कारचा टॅंक एकदा फुल केला की ती ६४६ किलोमीटर एवढे अंतर कापू शकते. 

असे आहे कारचे इंजिन

टोयोटा मिराई FCEV सेडानमध्ये एक हाय प्रेशर हायड्रोजन इंधन टाकी आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. त्याचे इंजिन हायड्रोजनपासून पाणी आणि ऑक्सिजन वेगळे करते आणि त्यातून ऊर्जा निर्माण करते. ही कार अंतर्गत ज्वलन इंजिनासारख्या वायूंऐवजी तिच्या टेलपाइपमधून म्हणजेच सायलेन्सरमधून पाणी बाहेर काढते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी