Nitin Gadkari news: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या वेगवेगळ्या मिशन आणि महामार्गाची कामे पूर्ण करण्यात व्यस्त असतात. नितीन गडकरी यांच्या कामांच्या यादीत ग्रीन हायड्रोजन हा प्रकल्प देखील आहे. पर्यायी इंधनाचा आग्रह करणाऱ्या नितीन गडकरींनी अभियंता आणि व्यावसायिकांच्या राष्ट्रीय परिषदेत पुन्हा एकदा त्याचा उल्लेख केला. नितीन गडकरी म्हणाले, भारतात किमान 1 डॉलर (सुमारे 80 रुपये) प्रति किलोग्रॅम दराने ग्रीन हायड्रोजन उपलब्ध करुन देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. तसे झाल्यास कार चालवणे आणखीनच स्वस्त होईल. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमधूनही नागरिकांना दिसाला मिळणार आहे. (Nitin Gadkari master plan ready if the tank of car is full once then you can drive 650km read in marathi)
एका रिपोर्टनुसार, पेट्रोलियम, बायोमास, ऑर्गेनिक वेस्ट आणि सीवेज (सांडपाणी) यापासानू ग्रीन हायड्रोजन बनवता येऊ शकते. विमान वाहतूक, रेल्वे आणि वाहन उद्योग यासह अनेक क्षेत्रात याचा वापर करता येऊ शकतो. टोयोटा मिराई ही हायड्रोजनवर चालणारी कार आहे. हायड्रोजनने टाकी फुल केल्यास गाडी 650 KM पर्यंतचा प्रवास करू शकते.
अधिक वाचा : ओला आणि चेतकला टक्कर देण्यासाठी आली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, 200 किमी पर्यंतचा पल्ला
ही फक्त एक इलेक्ट्रिक कार आहे. ही चालवण्यावर त्यात बसवण्यात आलेल्या हायड्रोजन फ्युएल सेलमधून वीज निर्मिती केली जाते. या इंधनातील ऑक्सिजन आणि त्याच्या इंधन टाकीतील हायड्रोजन यांच्यात रासायनिक क्रिया करून वीज निर्माण करतात. पाणी (एचटूओ) आणि वीज या दोघांच्या रासायनिक अभिक्रियाने निर्माण होते. या वीजेवर कार चालते. तर त्यातील पॉवर कंट्रोल युनिट अतिरिक्त पॉवर गाडीतील बॅटरीला साठवून ठेवते.
याच कार्यक्रमात गडकरींनी पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलवरही भर दिला आहे. इथेनॉलची किंमत 62 रुपये प्रतिलिटर असल्याचं त्यांनी म्हटलं. मूल्यानुसार, 1 लिटर पेट्रोल 1.3 लिटर इथेनॉलच्या बरोबरीचे आहे. म्हणजेच इथेनॉलचे कॅलरी मूल्य पेट्रोलपेक्षा कमी होते. इंडियन ऑईलने रशियन वैज्ञानिकांसोबत मिळून दोन इंधनांच्या कॅलरीवर मूल्य नियुक्त करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम केले होते. पेट्रोलियम मंत्रालयाने आता हे तंत्रज्ञान प्रमाणित केले आहे.