Green Hydrogen Car : पेट्रोल डिझेलची चिंता सोडा हायड्रोजन कार वापरा

Nitin Gadkari Rolls Into Parliament In Hydrogen Car : हायड्रोजन कारची इंधन टाकी पूर्ण भरल्यास गाडी सहाशे किलोमीटरचा प्रवास सहज शक्य आहे. फक्त दोन रुपये प्रति किलोमीटर एवढ्या माफक खर्चात हायड्रोजन कारने प्रवास करता येईल.

Nitin Gadkari Rolls Into Parliament In Hydrogen Car
Green Hydrogen Car : पेट्रोल डिझेलची चिंता सोडा हायड्रोजन कार वापरा 
थोडं पण कामाचं
  • Green Hydrogen Car : पेट्रोल डिझेलची चिंता सोडा हायड्रोजन कार वापरा
  • हायड्रोजन कारची इंधन टाकी पूर्ण भरल्यास गाडी सहाशे किलोमीटरचा प्रवास सहज शक्य
  • दोन रुपये प्रति किलोमीटर एवढ्या माफक खर्चात हायड्रोजन कारने प्रवास करता येईल

Nitin Gadkari Rolls Into Parliament In Hydrogen Car : नवी दिल्ली : दररोज इंधनाच्या दरात थोडी वाढ होत आहे. पण या दरवाढीची चिंता करायची नसेल तर हायड्रोजन कार वापरणे हा उत्तम पर्याय आहे. या कारची इंधन टाकी पूर्ण भरल्यास गाडी सहाशे किलोमीटरचा प्रवास सहज शक्य आहे. फक्त दोन रुपये प्रति किलोमीटर एवढ्या माफक खर्चात हायड्रोजन कारने प्रवास करता येईल.

प्रायोगिक तत्वावर भारतात ग्रीन हायड्रोजन कार प्रकल्प सुरू आहे. या प्रयोगाचा भाग म्हणून जपानच्या टोयोटा कंपनीने तयार केलेली आणि ग्रीन हायड्रोजन या इंधनावर चालणारी टोयोटा मिरा ही कार वापरून गडकरी संसदेच्या आवारात आले. या कारमध्ये हरयाणातील फरिदाबादच्या इंडियन ऑईलच्या पंपावरून ग्रीन हायड्रोजन भरण्यात आले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज (बुधवार ३० मार्च २०२२) संसदेच्या आवारात पर्यावरणपूरक ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर करणाऱ्या कारमधून दाखल झाले. ही कार इंधन टाकी पूर्ण भरल्यास गाडी सहाशे किलोमीटरचा प्रवास सहज करते. या कारमुळे दोन रुपये प्रति किलोमीटर एवढ्या माफक खर्चात प्रवास शक्य होईल. 

ग्रीन हायड्रोजन कारची इंधन टाकी दोन-पाच मिनिटांत पूर्ण भरते. यामुळे इंधन भरण्यासाठी जास्त वेळ खर्च करावा लागत नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीला गडकरी यांनी पर्यावरणपूरक ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे देशाला ऊर्जेचा एक सक्षम पर्याय मिळेल, असे सांगितले. यानंतर महिना संपण्याआधीच स्वतः गडकरी एका ग्रीन हायड्रोजन कारमधून संसदेच्या परिसरात दाखल झाले. 

पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगवेगळे करून नंतर उच्च दाबाने हायड्रोजन कारमध्ये भरावा लागतो. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातूनही हायड्रोजन वेगळा करून तो उच्च दाबाने ग्रीन हायड्रोजन कारमध्ये भरणे शक्य आहे. या प्रक्रियेत ग्रीन हायड्रोजनवर होणारा खर्च हा किलोमीटरमागे दीड ते दोन रुपये एवढा असेल असे परिवहनमंत्री गडकरी यांनी सांगितले. 

पेट्रोल कारचा इंधनासाठी किलोमीटरमागे दहा रुपये खर्च होतो. इलेक्ट्रिक कारचा इंधनासाठी किलोमीटरमागे एक रुपया खर्च होतो. तर ग्रीन हायड्रोजन कारचा इंधनासाठी किलोमीटरमागे दीड ते दोन रुपये एवढा खर्च होतो. ग्रीन हायड्रोजन कारमध्ये साडेपाच किलो हायड्रोजन भरणे शक्य आहे. पाणी आणि ओल्या कचऱ्यावर केलेल्या प्रक्रियेतून ग्रीन हायड्रोजन हे पर्यावरणपूरक इंधन तयार करणे शक्य आहे. यामुळे हा एक उत्तम पर्याय असल्याचे परिवहनमंत्री गडकरी म्हणाले.

भारत सरकारने तीन हजार कोटींची ग्रीन हायड्रोजन मोहीम हाती घेतली आहे. लवकरच भारत सरकार ग्रीन हायड्रोजन निर्यात करणारा देश बनेल. सध्या पाच डॉलर प्रति किलो या दराने उपलब्ध असलेला ग्रीन हायड्रोजन एक डॉलर प्रति किलो या दरावर आणण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे; असे परिवहनमंत्री गडकरी यांनी सांगितले.

ग्रीन हायड्रोजनचे फायदे

  1. पाणी आणि ओला कचरा या दोन्हीवर प्रक्रिया करून त्यातून हायड्रोजन वेगळा करून तो उच्च दाबाने इंधन टाकीत भरणे शक्य. या २ तंत्रांमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर ग्रीन हायड्रोजन अर्थात पर्यावरणपूरक हायड्रोजन उपलब्ध होऊ शकतो.
  2. पर्यावरणपूरक हायड्रोजनच्या ज्वलनातून कोणतेही प्रदूषण करणारे घटक वातावरणात पसरत नाहीत. 
  3. पर्यावरणपूरक हायड्रोजन अनेक उच्च क्षमतेची यंत्र तसेच वीज निर्मिती करणारी संयंत्र चालविण्यासाठी उपयुक्त आहे. 

धोका

ग्रीन हायड्रोजन अर्थात पर्यावरणपूरक हायड्रोजन प्रचंड ज्वलनशील आहे. यामुळे हे इंधन ज्या टाकीत असेल ती टाकी अतिशय सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा मोठी आग लागण्याचा धोका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी