ओडिसी  इलेक्ट्रीक वेहीकल्सने लॉन्च केली नवीन कमी वेगवान स्कूटर

ओडिसी  इलेक्ट्रीक वेहीकल्स ही देशातंर्गत इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती कंपनी असून त्यांनी भारतीय बाजारपेठेकरिता नवीन कमी वेगाची ई2गो स्कूटर लॉन्च केली.

Odysse Electric Vehicles launches its new low speed scooter
ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सची नवी स्कूटर बाजारात   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दोन नवीन वेरीयंट सादर– ई2गो आणि ई2गो लाईट
  • सध्या जगात ई-मोबिलिटी साधनांची रेलचेल सुरू आहे.
  • लीड-अॅसिड आणि लिथियम आयोन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर पळण्यासाठी किफायतशीर आहेत

मुंबई :  सध्या जगात ई-मोबिलिटी साधनांची रेलचेल सुरू आहे. दुचाकी निर्मितीमधील अग्रगण्य देश म्हणून भारताचा उदय झाला. ओडिसी  इलेक्ट्रीक वेहीकल्स ही देशातंर्गत इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती कंपनी असून त्यांनी भारतीय बाजारपेठेकरिता नवीन कमी वेगाची ई2गो स्कूटर लॉन्च केली.

लीड-अॅसिड आणि लिथियम आयोन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर पळण्यासाठी किफायतशीर आहेत, शिवाय त्यांच्याकरिता कोणत्याही नोंदणीची किंवा परवान्याची आवश्यकता नसते. या स्कूटरची शुभारंभाची किंमत देखील अतिशय कमी असून ती युवा वर्ग आणि महिलांसाठी उत्तम पर्याय ठरेल. ई2गो आणि ई2गो लाईटची अनुक्रमे किंमत रु 52,999 आणि रु 63,999 (एक्स-शोरूम अहमदाबाद) याप्रमाणे आहे. या उत्पादनांची मॉडेल्स 5 रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहेत.   

"ई2गोची निर्मिती ही शहरांतील महिला आणि युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून करण्यात आली. या गटातील ग्राहकांना दळणवळणाची सूत्रे किफायतशीर किंमतीत स्वत:च्या हातात राखायला आवडते. त्याप्रमाणे या उत्पादनाकरिता कोणत्याही प्रकारची नोंदणी प्रक्रिया अथवा परवान्याची गरज नाही” असे ओडिसी  इलेक्ट्रीक वेहीकल्सचे चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर नेमीन वोरा यांनी सांगितले. "आमचे या दिशेने योगदान भारताच्या शहरांतील प्रदूषणाचा स्तर नक्कीच कमी करेल ही आशा आहे," असेही ते पुढे म्हणाले.

ओडिसी  ई2गो’मध्ये 250 वॅट, 60व्ही बीएलडीसी मोटर (वॉटरप्रूफ) इलेक्ट्रीक मोटर बसविण्यात आली आहे. या उत्पादनात 1.26 केडब्ल्यूएच लिथियम-आयोन बॅटरी किंवा 28 एएच लीड अॅसिड बॅटरी हे दोन बॅटरी पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांत अँटी-थेफ्ट मॅकेनिझमची सोय आहे. इलेक्ट्रीक स्कूटरचा सर्वोच्च वेग 25 केएमपीएच असून पूर्ण चार्ज झाल्यावर 60 किमीचे अंतर पार करू शकते. ज्याकरिता सुमारे 3.5 ते 4 तास लागतात.

यामध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क, ड्यूएल स्प्रिंग हायड्रॉलिक रिअर शॉक अॅबसॉर्बर देण्यात आले आहे. नवीन ओडिसी ई2गो इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रिवर्स गियर फंक्शन, 3 ड्राईव्ह मोड्स, एलईडी स्पीडोमीटर, अँटी-थेफ्ट मोटर लॉकिंग, कि-लेस एन्ट्री आणि युएसबी चार्जिंग दिलेले आहे. यामधील लिथियम बॅटरीज पोर्टेबल असून 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात. या बॅटरीज ओडिसी विक्रेत्यांकडे देखील सहज उपलब्ध असतील.

महासाथ-पश्चात काळात सर्वसाधारण भारतीयासाठी स्वत:चे वैयक्तिक वाहन असणे सुरक्षित आणि अतिमहत्त्वाचे झाले आहे. आगामी काळात हा घटकच विकासाला चालना देण्यात मोलाचा ठरणार असल्याचे कंपनीचे मत आहे.

ओडिसी कडून ग्राहकांना सर्वोत्तम वित्तीय योजनांसह आर्थिक टाय-अपची सुविधा देण्यात येईल. वित्तीय भागीदारांमध्ये आयडीएफसी बँकेसह राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक भागीदारांचा समावेश आहे.

देशभरात कंपनीचे नऊ विक्रेते कार्यरत आहेत. ग्राहकांना साह्य करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक दालनात सर्विस सेंटर अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च 2021 दरम्यान आणखी 10 नव्या दालनांची भर पडेल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत 25 हून अधिक शहरांत ओडिसी उपलब्ध होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी