जबरदस्त ऑफर! फक्त २ लाखांत खरेदी करा ही ४ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची स्टाईलीश कार, कुठे मिळते आहे ऑफर

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 19, 2021 | 13:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

या कारचे नाव अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI) आहे आणि या कारला तुम्ही मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवरून फक्त २ लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Offer : Maruti Alto 800 in just Rs 2 lacs
फक्त २ लाख रुपयांत अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI) 

थोडं पण कामाचं

  • मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर ऑफर
  • अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI)वर ऑफर
  • २ लाख रुपये किंमत, सेकंड हॅंड कार

नवी दिल्ली : हल्ली अनेक कार उत्पादक कंपन्या नवनवीन वैशिष्ट्यांसह कार बाजारात आणत आहेत. मात्र जेव्हा आपण या कारच्या किंमतींकडे लक्ष देतो तेव्हा त्या आपल्या बजेटबाहेर असल्याचे जाणवते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला अशा ऑफरची माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ४ लाख रुपये किंमतीची कार फक्त २ लाख रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

मारुती अल्टो ८००


या कारचे नाव अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI)आहे. मारुती सुझुकीने ही ऑफर आणली आहे. मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर फक्त २ लाख रुपयांत तुम्ही अल्टो ८०० एलएक्सआय ही कार विकत घेऊ शकता. खरंतर ही एक सेकंड हॅंड कार आहे, जिला ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर विकण्यात येते आहे. हे २०१७चे मॉडेल आहे आणि यामध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार एकूण ८१,०६१ किलोमीटर चालली आहे. ही कार, फर्स्ट ओनर कार आहे. कार व्हाईट कलरमध्ये आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आहे.

कारमध्ये मिळतील या सुविधा


जर तुम्ही ही अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI)कार विकत घेतली तर यासोबत तुम्हाला एक वर्षांची वारंटी आणि तीन फ्री सर्व्हिसेस मिळतील. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही कार मारुती सुझुकीच्या जेन्यूईन पार्ट्ससह उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही तुमचे नाव, मोबईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करू शकता. शिवाय डिलरलासुद्धा संपर्क करू शकता. जर तुम्हाला यासंदर्भात आणखी माहिती हवी असेल तर  (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-shimla-2017/AXi6Vqy_NiwKO4z0Jyga)या लिंकवर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.

अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI)


देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी या कंपनीच्या टॉप सेलिंग कारपैकी एक मॉडेल अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI)हे आहे. सध्या अल्टो ८०० एलएक्सआय (Alto 800 LXI)कारची किंमत ४.१४ लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे. 

तुम्ही जर सेकंड हॅंड कार विकत घेणार असाल तर वेबसाईटवर जाऊन सर्व बाबींची माहिती घेऊन आणि योग्य पद्धतीने तपासून मगच निर्णय घ्या. त्यानंतरच कारची खरेदी करा.

सध्या कार ही मध्यमवर्गीयासांठीसुद्धा एक आवश्यक बाब झाली आहे. त्यात फॅमिली कार तर प्रत्येक कुटुंबाला हवीच असते. बाजारात अनेक कारचे मॉडेल उपलब्ध आहेत. त्यातील तुमच्या बजेट आणि गरजेनुरुप योग्य ते मॉडेल निवडणे हे खूप महत्त्वाचे आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनमध्ये विविध कार उपलब्ध आहेत. तसेच अनेक कंपन्या वेळोवेळी विविध ऑफर्सदेखील बाजारात आणत असतात. त्यातच भारतीय वाहन बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्यामुळे अनेक नवनवीन कंपन्या बाजारात येत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेकडे आपला मोहरा वळवला आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी