Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक हायपर चार्जर फक्त १८ मिनिटात करणार ५० टक्के चार्ज

Ola Electric Scooter :ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा हायपरचार्जर ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला फक्त १८ मिनिटात ० ते ५० टक्के चार्ज करतो. यामुळे ७५ किमीच्या हाफ सायकल रेंजसाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर फिट बसणार आहे.

Ola Electric scooter hyper charger
ओला इलेक्ट्रिक स्कूटर हायपर चार्जर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर पिवळ्या रंगाच्या एस१ ई-स्कूटरला हायपरचार्जरने चार्ज करतानाचे फोटो केले शेअर
  • हायपरचार्जर ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला फक्त १८ मिनिटात ० ते ५० टक्के चार्ज करतो.
  • ओला एस१ची किंमत १ लाख रुपये (एक्स शोरुम)ठेवण्यात आली आहे

Ola Electric Scooter । नवी दिल्ली: ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric scooter) १० नोव्हेंबरला टेस्ट राइडची सुरूवात करण्याआधी आपल्या इलेक्ट्रिक एस१ स्कूटरला चार्ज करण्यासाठी आपला पहिला हायपर चार्जर लॉंच करण्याची घोषणा केली आहे. ओला इलेट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर पिवळ्या रंगाच्या एस१ ई-स्कूटरला हायपरचार्जरने चार्ज करतानाचे फोटो शेअर केले आहेत. भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर पिवळ्या रंगाच्या एस१ ई-स्कूटरचे फोटो शेअर करताना म्हटले आहे की 'पहिला @OlaElectric हायपरचार्जर लाईव्ह झाला. मॉर्निंग ट्रिपनंतर माझी एस१ चार्ज करा.' कंपनीने याआधी घोषणा केली होती ते आपल्या हायपरचार्जर सेटअपअंतर्गत आपल्या ग्राहकांसाठी चार्जिंग सपोर्ट बनवणार आहे. स्कूटरला चार्ज करण्यासाठी कंपनी ४०० भारतीय शहरांमध्ये १,००,०००पेक्षा जास्त ठिकाणी बसवणार आहे. (Ola Electric scooter hyper charger charges the 50 % scooter in just 18 min)

१८ मिनिटात ७५ किमीची रेंज

हा हायपरचार्जर ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला फक्त १८ मिनिटात ० ते ५० टक्के चार्ज करतो. यामुळे ७५ किमीच्या हाफ सायकल रेंजसाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर फिट बसणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर कोणत्या शहरात चार्जर लावला जाणार आहे त्याची पूर्ण यादी देण्यात आली आहे. टियर १  आणि टियर २ची बहुतांश शहरे याच्या चार्जिंग नेटवर्कमध्ये कव्हर केले जाणार आहेत. हायपरचार्जर स्टेशनांवर मल्टीलेव्हर आउटलेट दिला जाणार आहे जेणेकरून एकाचवेळी अनेक ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

ओला एस१ची किंमत असणार १ लाख

पहिला हायपरचार्जरचा रोल आउट ओला इलेक्ट्रिक एस१ आणि एस२ प्रो स्कूटरांसाठी टेस्ट राइडच्या सुरूवात होण्याच्या काही दिवस आधीच येतो आहे. दोन्ही स्कूटरना १५ ऑगस्टला लागू करण्यात आले होते. ओला एस१ची किंमत १ लाख रुपये (एक्स शोरुम)ठेवण्यात आली आहे आणि सिंगल चार्जवर याची अंदाजित रेंज १२० किलोमीटर आहे. ही स्कूटर १० रंगांमध्ये उपलब्ध आहे. ३.९७ kWh बॅटरी पॅकसोबत जोडले गेलेल्या ८.५ kW इलेक्ट्रिक मोटरमधून पॉवर मिळते. एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर १८० किलोमीटरच्या रेंजसह मिळते. याशिवाय मोठ्या बॅटरी पॅकमुळे याची किंमत १.३० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर ११५ किमी प्रति तास या टॉप स्पीडवर चालते.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा विक्रीचा विक्रम

ओला इलेक्ट्रिकने लॉंच करायच्या आधी प्रीबुकिंग सुरू करताना २४ तासाच्या आता विक्रमी १ लाख बुकिंग्स मिळवल्या होत्या. जगातील कोणत्याही वाहनाने प्री-बुकिंगमध्ये सर्वाधिक बुकिंग मिळवण्याचा हा विक्रम आहे. ओला इलेक्ट्रिकने १५ जुलैला संध्याकाळी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू केली होती. ओला एस १ आणि एस १ प्रो या दोन वाहनांना एक महिन्याने १५ ऑगस्टला लॉंच करण्यात आले होते. ओला स्कूटर विकत घेताना रंग निवडणे, टाईप निवडणे, कर्जाची निवड करणे किंवा अंतिम भुगतान करणे आणि डिलिव्हरीची तारीख घेणे या प्रक्रियेचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी