ओला इलेक्ट्रिक स्कूटर जुलैमध्ये लाँच होणार

अॅप बेस्ड कॅब सेवा पुरवणारी ओला कंपनी जुलै २०२१ मध्ये त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल करणार आहे.

ola electric scooter
ओला इलेक्ट्रिक स्कूटर जुलैमध्ये लाँच होणार 

थोडं पण कामाचं

  • ओला इलेक्ट्रिक स्कूटर जुलैमध्ये लाँच होणार
  • ओला कंपनी देशातील ४०० शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉइंट तयार करणार
  • दरवर्षी २० लाख इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल करणार

मुंबईः अॅप बेस्ड कॅब सेवा पुरवणारी ओला कंपनी जुलै २०२१ मध्ये त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल करणार आहे. ओला इलेक्ट्रिक या नावाने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहे. ही स्कूटर लाँच करण्याआधी ओला कंपनी देशातील ४०० शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉइंट तयार करणार आहे. ola electric scooter

ओला कंपनीने २०२० मध्ये तामीळनाडूत त्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी कंपनीने २४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर किमान दहा हजार थेट रोजगार निर्माण करेल, असा विश्वास ओला कंपनीला आहे. 

तामीळनाडूत सुरू केलेला स्कूटर निर्मिती प्रकल्प हा इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीच्या क्षेत्रातील जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची क्षमता दरवर्षी २० लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्री योग्य स्थितीत तयार करुन देण्याची आहे. प्रकल्प जून महिन्यापासून स्कूटर निर्मिती सुरू करेल. जुलै महिन्यापासून प्रकल्पात तयार झालेल्या स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध होतील; अशी माहिती ओला कंपनीने दिली. 

प्रकल्प सुरू करुन पहिल्या वर्षी २० लाख स्कूटर बाजारात दाखल करायच्या नंतर प्रकल्पाची क्षमता वाढवायची अशी कंपनीची योजना आहे. यासाठीचे नियोजन सुरू आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर चर्जिंग पॉइंटवर १८ मिनिटांच्या आत 50 टक्के चार्ज होतील, असे ओला कंपनीने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी