Sea Plane ची सफर फक्त १५०० रुपयात, गुजरातमध्ये करणार पंतप्रधान मोदी शुभारंभ 

SpiceJet offer sea plane journey: स्पाइसजेट भारतात पहिला समुद्र विमान प्रवास करणार आहे, ते साबरमती रिव्हर फ्रंट आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान उड्डाण करेल.

sea-plane
गुजरातमध्ये Sea Plane ची सफर फक्त १५०० रुपयात  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: स्पाइसजेट (SpiceJet)भारतीयांसाठी पहिलं सी प्लेन (Sea Plane) सेवा सुरू करणार आहे. याबद्दल लोक खूप उत्सुक आहेत. असे सांगितले जात आहे की, ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) हे ही सेवा सुरू करतील आणि ते स्टॅच्यू ऑफ युनिटी ते अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटकडे समुद्री विमानाने प्रवास करतील. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा अतिशय आकर्षक उपक्रम ठरणार आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंट आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान शनिवारी दररोज दोन सी प्लेनची उड्डाणे होणार असल्याचे स्पाइसजेटने सांगितले आहे.

स्पाइसजेट एअरलाइन्सने सांगितले की, 'उडान योजनेंतर्गत याचं एका बाजूचे भाडे १५०० रुपये असणार आहे. याचे तिकीट ३० ऑक्टोबर २०२० नंतर स्पाइसच्या शटल वेबसाइटवरून तिकिटे उपलब्ध होतील.' स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह म्हणाले की, भारतीय विमान सेवेच्या  इतिहासामध्ये प्रथमच सी-प्लेन उड्डाण करेल.

३० मिनिटे असणार प्रत्येक फ्लाइटची वेळ  

स्पाइस जेटची उपकंपनी असलेल्या स्पाइस शटलद्वारे सीप्लेन विमाने चालविली जातील. प्रत्येक विमानाचा कालावधी सुमारे ३० मिनिटांचा असेल. उडान योजनेअंतर्गत हवाई परिवहन सेवा न चालविणाऱ्या विमानतळांवरील उड्डाणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे व विमानतळ संचालकांनी निश्चित केलेल्या विमान कंपन्यांना आर्थिक मदत दिली जाते. विमानातील जवळपास निम्म्या जागांवर अनुदानित भाडे दिले जाते. स्पाइसजेटने सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी अहमदाबाद-केवडिया विमानांचे परिचालन सुरू होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत.  यावेळी ते गुजरातला सी-प्लेन सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी ही एक योजना आहे. याची सुरुवात पंतप्रधान मोदींनी 2017 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केली होती, पण आता याला स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जोडले गेले आहे. दरम्यान, सी-प्लेन हे मागील काही दिवसांपूर्वीच मालदीवहून कोच्चीनला आलं होतं. आता ते गुजरातला पोहचलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी