रेनॉ ची जबरदस्त ऑफर, कार मिळते आहे ७५,००० रुपयांपर्यतची सूट

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 10, 2021 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

रेनॉ इंडिया डिस्काऊंट ऑफर (Renault India discount offer)- ही ऑफर ३० एप्रिल २०२१ पर्यत आहे. किंमतीतील सूट आणि इतर फायद्यांचा लाभ फक्त ठराविक मॉडेलवरच मिळणार आहे. वेगवेगळ्या मॉडेरवरील ऑफर वेगवेगळ्या असू शकतात.

Renault India gives special offers to customers
रेनॉ इंडियाने आणल्या ग्राहकांसाठी खास ऑफर 

थोडं पण कामाचं

  • रेनॉ इंडिया डिस्काऊंट ऑफर
  • ही ऑफर ३० एप्रिल २०२१ पर्यत आहे
  • किंमतीतील सूट आणि इतर फायद्यांचा लाभ फक्त ठराविक मॉडेलवरच मिळणार आहे

नवी दिल्ली :  रेनॉ इंडिया (Renault India)च्या या ऑफर मध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, रॉयल्टी बेनिफिट, कॉर्पोरेट डिस्काऊंट, रुरल डिस्काऊंट यांचा समावेश आहे. रेनॉने ज्या मॉडेलवर ऑफर दिल्या आहेत त्यात रेना क्विड (Renault Kwid), रेनॉ ट्राईबर (Renault Triber) आणि रेनॉ डस्टर (Renault Duster)यांचा समावेश आहे.

रेनॉ क्विड (Renault Kwid)-५०,००० रुपयांपर्यतचा लाभ + डिस्काऊंट


१. एक्सचेंज बेनिफिट २०,००० रुपयांपर्यत
२. लॉयल्टी बेनिफिट १०,००० रुपयांपर्यत
३. कॅश बेनिफिट (२०२० मॉडेलवर) २०,००० रुपये
४. कॅश बेनिफिट (२०२१ मॉडेलवर) १०,००० रुपये
५. कॉर्पोरेट डिस्काऊंट १०,००० रुपयांपर्यत
६. स्पेशल ऑफर ५,००० रुपयांपर्यत (फक्त ग्रामीण ग्राहकांसाठी)

रेनॉ ट्राईबर (Renault Triber)-५०,००० रुपयांपर्यतचा लाभ + कॉर्पोरेट डिस्काऊंट


२०२१ च्या मॉडेलवर डिस्काऊंट
१. एक्सचेंज बेनिफिट २०,००० रुपयांपर्यत
२. लॉयल्टी बेनिफिट १०,००० रुपयांपर्यत (काही मॉडेलवर)
३. कॅश बेनिफिट (२०२० मॉडेलवर) १५,००० रुपये
४. कॉर्पोरेट डिस्काऊंट १०,००० रुपयांपर्यत
५. स्पेशल ऑफर ५,००० रुपयांपर्यत (फक्त ग्रामीण ग्राहकांसाठी)
६. स्पेशल रेट आणि व्याज - ६.९९ टक्के

रेनॉ डस्टर (Renault Duster) (1.5-litre)- ४५,००० रुपयांपर्यतचा लाभ + कॉर्पोरेट डिस्काऊंट


१. एक्सचेंज बेनिफिट ३०,००० रुपयांपर्यत (RXS आणि RXZ व्हेरिएंटवर)
२. लॉयल्टी बेनिफिट १५,००० रुपयांपर्यत
३. कॅश बेनिफिट (२०२० मॉडेलवर) १५,००० रुपये
४. कॉर्पोरेट डिस्काऊंट ३०,००० रुपयांपर्यत
५. स्पेशल ऑफर १५,००० रुपयांपर्यत (फक्त ग्रामीण ग्राहकांसाठी)

रेनॉ डस्टर (Renault Duster) (1.3-litre)- ७५,००० रुपयांपर्यतचा लाभ + कॉर्पोरेट डिस्काऊंट


१. एक्सचेंज बेनिफिट ३०,००० रुपयांपर्यत (RXS आणि RXZ व्हेरिएंटवर)
२. लॉयल्टी बेनिफिट १५,००० रुपयांपर्यत, २०,००० रुपये (RXE व्हेरिएंटवर)
३. कॅश बेनिफिट (२०२० मॉडेलवर) ३०,००० रुपये (RXS, CVT आणि MT व्हेरिएंटवर)
४. कॉर्पोरेट डिस्काऊंट ३०,००० रुपयांपर्यत
५. स्पेशल ऑफर १५,००० रुपयांपर्यत (फक्त ग्रामीण ग्राहकांसाठी)

ऑफरसंदर्भात महत्त्वाची माहिती


रेनॉ इंडिया (Renault India)ची ही कारसाठीची ऑफर ३० एप्रिल २०२१ पर्यतच आहे. डिस्काऊंट आणि बेनिफिटचा फायदा फक्त ठराविकच मॉडेलासाठी आहे. वेगवेगळ्या व्हेरिएंटवरील ऑफर वेगवेगळ्या असू शकतात. या विविध ऑफरसंदर्भातील अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या रेनॉ डिलरशीपकडे संपर्क करा.

कोरोनामुळे विविध क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. बाजारातील मागणीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. मागील काही वर्षांपासून आधीच संकटात असलेला वाहन उद्योग कोरोनामुळे आणकी अडचणीत आला आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या अनेक ऑफर देत आहेत. या जबरदस्त ऑफरचा लाभ घेत ग्राहकांनी जास्तीत जास्त खरेदी करावी ही कंपन्यांची अपेक्षा आहे. भारताप्रमाणेच अमेरिका, युरोप आणि चीनमधील वाहन उद्योगासमोरदेखील मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षातील विविध कंपन्यांची कामगिरी लवकरच तिमाही निकालांच्या रुपाने समोर येईल. त्यात देशाच्या वाहन उद्योगाचे चित्र स्पष्ट होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी