रॉयल एनफील्ड बुलेट नव्या रंगात आणि रूपात, पाहा घ्या काय आहे खास

भ्रूममभ्रूमम
Updated Aug 12, 2019 | 16:15 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Royal Enfield: रॉयल एनफील्डने बुलेट आता सहा नव्या रंगांत लॉन्च केली आहे. यासोबतच बुलेट जुन्या रंगांतही उपलब्ध आहे. जाणून घ्या या बुलेटची किंमत आणि फिचर्स काय आहेत.

royal enfield bullet
रॉयल एनफील्ड बुलेट नव्या रंगात आणि रूपात 

थोडं पण कामाचं

  • रॉयल एनफील्डने सहा नव्या रंगांत लॉन्च केली बुलेट
  • रॉयल एनफील्ड बुलेट तीन नव्या रंगांसह जुन्या रंगांतही उपलब्ध असणार
  • तर रॉयल एनफील्ड बुलेट ईएस तीन नव्या रंगांत उलब्ध असणार आहे

मुंबई: बुलेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. रॉयल एनफील्डने आपली बुलेट आता सहा नव्या रंगांत लॉन्च केली आहे. 350x या बुलेटची किंमत 1.12 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. रॉयल एनफील्ड कंपनीने आता या बुलेटसाठी ग्राहकांकडून बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. रॉयल एनफील्ड बुलेट आता सिल्वर, सफायरल ब्ल्यू आणि अनॉक्सी ब्लॅक या रंगांत सुद्धा उपलब्ध असणार आहे. ही बुलेट यापूर्वीपासूनच ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. यासोबतच रॉयल एनफील्ड बुलेट ईएस जेट ब्लॅक, रिगल रेड आणि रॉयल ब्ल्यू या रंगांत उपलब्ध होणार आहे. तसेच सध्या असलेला मरून आणि सिल्वर हा रंगांचा पर्यायसुद्धा ग्राहकांसमोर असणार आहे.

रॉयल एनफील्ड 350X (किकस्टार्ट) या बुलेटची एक्स शोरूम किंमत 1.12 लाख रुपये आहे. तर 350ES (इलेक्ट्रिक स्टार्ट) ची किंमत 1.27 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. याचाच अर्थ बुलेट 350 च्या तुलनेत बुलेट 350X खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 9000 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. रॉयल एनफील्ड बुलेट आणि रॉयल एनफील्ड ईएस बुलेट या दोन्हीमध्ये सिंगल सिलिंडर, 4 स्टोर, ट्वीन स्पार्क, एअर कूल्ड, 346 cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे जे 19.8  bhp ची ताकद आणि  28 Nm टॉर्क जनरेट करतं. ही मोटर 5 स्पीड यूनिट असलेल्या ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त रॉयल एनफील्डने 250 नवे स्टूडिओ स्टोअर टायर 2 आणि टायर 3 शहरांत लॉन्च केले आहेत. या स्टोअर्समध्ये ग्राहकांना रॉयल एनफील्ड मोटरसायकलच्या सर्व अॅक्सेसरिज, सर्व्हिसेस आणि स्पेअर पार्ट्सचं पूर्ण पोर्टफोलिओ उपलब्ध होणार आहे. हे स्टोअर्स (रिटायर्ड आर्मिमेन) निवृत्त सैनिकांमार्फत चालवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दुचाकी वाहन निर्माता कंपनीने आपली ओनरशिप आणखीन चांगली करण्यासाठी नवी पाऊलं उचलण्याची घोषणा केली आहे. कंपनी फ्रेश सर्व्हिसेस प्रोसेस आणि टेक्नोलॉजीचा वापर करण्यास सुरूवात करणार आहे. आपली सुविधा इंटरवल वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीने हे पाऊल उचलले आहे कारण ग्राहकांना बाईकचं ऑईल आता सहा महिन्यांत किंवा 5000 किलोमीटरमध्ये बदलण्याऐवजी 12 महिन्यांत किंवा 10000 किलोमीटरमध्ये बदलता येणार आहे.

रॉयल एनफील्डचे सीईओ विनोद दसारी यांनी सांगितले की, 'हा आमचा सततचा प्रयत्न आहे की दूरच्या ग्राहकांपर्यंत पोहचून आपली एक ओळख निर्माण करावी. सोबतच भारतात आपला प्रसार करण्यास प्रयत्नशील आहोत. अनेक लहान शहरांतून रॉयल एनफील्डच्या गाड्यांना चांगली मागणी मिळत आहे. गाड्यांची ही मागणी कंपनीच्या वाढीची क्षमता दाखवत आहे'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
रॉयल एनफील्ड बुलेट नव्या रंगात आणि रूपात, पाहा घ्या काय आहे खास Description: Royal Enfield: रॉयल एनफील्डने बुलेट आता सहा नव्या रंगांत लॉन्च केली आहे. यासोबतच बुलेट जुन्या रंगांतही उपलब्ध आहे. जाणून घ्या या बुलेटची किंमत आणि फिचर्स काय आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...