Second hand car खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

used car buying tips: भारतामध्ये वापरलेल्या कार्सच्या खरेदी- विक्रीची एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अनेक नागरिक जुन्या गाड्या खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही जुनी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • जुनी गाडी खरेदी करताना घ्या विशेष काळजी
  • गाडी तपासून घेतली नाही तर होईल पश्चाताप
  • सेकंड हँड कारवर चांगली डील मिळवण्यासाठी काही खास टिप्स

second hand car byuing tips in marathi: वापरलेल्या कार्सच्या खरेदी आणि विक्रीची भारतात मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. नवीन गाड्यांसोबतच जुन्या गाड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, वापरलेली कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. सेकंड हँड कार उत्तम स्थितीत असावी आणि ती खरेदी केल्यावर त्या गाडीवर मोठी रक्कम खर्च करण्याची वेळ यायला नको. (second-hand car buying if you are planning to purchase it then take these precaution technology auto news in marathi)

त्यामुळे तुम्ही तुमचं बजेट ठरवून सेकंड हँड गाडी निवडा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टेस्ट ड्राईव्ह करणे. टेस्ट ड्राईव्ह केल्याने तुम्हाला गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे याचा अंदाज येईल. जाणून घ्या जुनी गाडी खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी. 

टेस्ट ड्राईव्ह दरम्यान या गोष्टी ठेवा लक्षात

कार जुनी असल्याने भलेही तुम्हाला दमदार पिकअप मिळत नसेल पण हायवेवर गाडीने चांगला परफॉर्मन्स देणं आवश्यक आहे. जेव्हा कार ८० किमी प्रति तासाच्या वेगाने जात असेल तेव्हा गाडीच्या इंजिनचा आवाज, कारची स्थिरता आणि स्टेअरिंग व्हील नीट तपासा.

अधिक वाचा : Car care in monsoon : पावसाळ्यात तुमच्या कारमधील सर्वात महत्त्वाच्या 5 वस्तू, पाहा कोणत्या...

इंजिनचा आवाज मोठा नसावा :

जेव्हा तुम्ही हायवेवर गाडी चालवत असाल तेव्हा वेगात असताना इंजिनमधून नॉर्मल आवाज यायला हवा. इंजिनचा प्रचंड आवाज येत असेल तर यावरुन लक्षात येतं की, इंजिनमध्ये काहीतरी गडबड आहे. 

अधिक वाचा : Old Car Sell: जुनी कार विकून चांगली रक्कम मिळवायची आहे? मग फक्त हे काम करा...

इंजिन आणि गिअर्स :

गाडी चालवताना इंजिन आणि गिअर्स यांच्यातील तालमेळ तपासून पाहा. जर ते योग्यरित्या काम करत नसेल तर क्लच प्लेटमध्ये समस्या असू शकते. याशिवाय कारच्या ट्रान्समिशन सिस्टममध्ये समस्या येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : SUV craze : भारतीयांचे वाढते SUV प्रेम ...कंपन्यांनी पाच वर्षांत लॉंच केली 36 मॉडेल्स

उतारावर वेग पकडण्याचा प्रयत्न करा :

टेस्ट ड्राईव्ह करत असताना गाडी एखाद्या चढावावर घेऊन जा त्यानंतर चढावावर गाडीचा वेग वाढवून पाहा. यावरुन गाडीचं इंजिन व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा लक्षात येईल.

सस्पेन्शन तपासा :

आरामदायक प्रवासासाठी सस्पेन्शन चांगल्या स्थितीत असणे फार महत्त्वाचे आहे. हे तपासण्यासाठी खड्डेमय रस्त्यावर गाडी घेऊन जा आणि सस्पेन्शनमधून आवाज तर येत नाहीये ना हे तपासा. 

ब्रेक तपासा :

गाडीचा ब्रेक ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर कार एबीएस सिस्टमने सुसज्ज असेल तर त्याच्या ब्रेक पेडलची स्थिती चेक करुन पाहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी