sell of this high mileage car will be discontinued, Renault Kwid 800cc Discontinued in India : भारतात 1 एप्रिल 2023 पासून बीएस 6 फेज 2 आणि आरडीई ईमिशन नॉर्म्स लागू झाले आहेत. या निकषांचे पालन करत नसलेल्या अनेक कारची विक्री संबंधित कंपन्यांनी थांबवली आहे.
रेनो इंडियाने अधिकृत वेबसाईटवरून क्विड 800 सीसी व्हेरियंट हटवले आहे. या हॅचबॅक मध्ये 0.8 लिटर पेट्रोल इंजिन होते. याला आरएक्सएल आणि आरएक्सएल (शून्य) व्हेरियंटमध्ये आणले होते. याची सुरुवातीची किंमत फक्त 4 लाख 36 हजार 895 रुपये होती. पण या कारची विक्री आता बंद करण्यात आली आहे.
नव्या निकषांचे पालन करणाऱ्या रेनो क्विड 1.0 लिटर पेट्रोल इंजिन मॉडेलची विक्री सुरू राहणार आहे. पण या संदर्भात अद्याप कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. ही घोषणा झाली नसली तरी रेनो इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर बदल दिसत आहे.
क्विड 800 मॉडेलचे 0.8 लिटर पेट्रोल इंजिन 52 बीएचपी पॉवरसह 72 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करण्यात सक्षम होते. इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स होते. कार 20 किमी प्रति लिटर पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम असल्याचे कंपनीकडून सांगितले जात होते.
रेनो लवकरच भारतात इलेक्ट्रिक व्हेईकलची रेंज लाँच करण्याची तयारी करत आहे. यात क्विड हॅचबॅक इलेक्ट्रिक व्हेईकल पण असेल. हे मेड इन इंडिया व्हेईकल असेल.
दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या CNG कार