अत्याधुनिक बाउन्सची इलेक्ट्रीक स्कूटर इन्फिनिटी येणार बाजारात 

रतातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सुविधा कंपनी बाऊन्स आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाऊन्स इन्फिनिटी २ डिसेंबर २०२१ रोजी बाजारात दाखल करण्यासाठी सज्ज आहे.  

अत्याधुनिक बाउन्सची इलेक्ट्रीक स्कूटर इन्फिनिटी येणार
Sophisticated bounce electric scooter Infinity will hit the market  
थोडं पण कामाचं
  • रतातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सुविधा कंपनी बाऊन्स आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाऊन्स इन्फिनिटी २ डिसेंबर २०२१ रोजी बाजारात दाखल करण्यासाठी सज्ज आहे.  
  •  खरेदीसाठी बुकिंग्स देखील त्याच दिवशी सुरु होणार असून डिलिव्हरीज पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्या जातील.  
  • अत्याधुनिक, 'मेड इन इंडिया' स्कूटर फक्त ४९९ रुपये भरून बुक करता येईल.

बेंगळुरू : भारतातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सुविधा कंपनी बाऊन्स आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाऊन्स इन्फिनिटी २ डिसेंबर २०२१ रोजी बाजारात दाखल करण्यासाठी सज्ज आहे.  खरेदीसाठी बुकिंग्स देखील त्याच दिवशी सुरु होणार असून डिलिव्हरीज पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्या जातील.  अत्याधुनिक, 'मेड इन इंडिया' स्कूटर फक्त ४९९ रुपये भरून बुक करता येईल.

'बॅटरी ऍज अ सर्व्हिस' पर्याय भारतीय बाजारपेठेत अशाप्रकारचा पहिलाच असून यामध्ये ग्राहकांना बाऊन्स इन्फिनिटी बॅटरीशिवाय अतिशय किफायतशीर किमतीला विकत घेण्याचा आणि प्रवासादरम्यान बाऊन्सच्या विशाल बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा उपयोग करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. बाऊन्सच्या स्वॅपिंग नेटवर्कमध्ये ग्राहक जेव्हा कधी एक रिकामी बॅटरी देऊन संपूर्णतः चार्ज्ड बॅटरी घेतील तेव्हा त्यांना फक्त बॅटरी स्वॅप्सचे पैसे भरावे लागतील.

ही स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी पॅकसोबत विकत घेण्याचा पर्याय देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.  बाऊन्स इन्फिनिटीमध्ये स्मार्ट, काढता येण्याजोगी ली-आयन बॅटरी आहे. ही बॅटरी काढता येते आणि आपल्या सोयीनुसार आणि आवश्यकतेनुसार चार्ज करता येते.    

२०२१ मध्ये बाऊन्सने 22मोटर्समध्ये १००% हिस्सेदारी जवळपास ७० लाख यूएस डॉलर्सना विकत घेतली.  22मोटर्ससोबत या व्यवहाराचा एक भाग म्हणून बाऊन्सने भिवडी, राजस्थान येथील त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि बौद्धिक संपदा देखील अधिग्रहित केली आहे.  या अत्याधुनिक प्लांटची क्षमता दरवर्षी १.८०,००० स्कूटर्स बनवण्याची आहे.  भारतीय बाजारपेठेतील संभाव्य संधी ओळखून या कंपनीने दक्षिण भारतात आणखी एक प्लांट बनवण्याची योजना आखली आहे.  

पुढील एक वर्षभरात इलेक्ट्रिक वेहिकल व्यवसायात गुंतवणुकीसाठी बाऊन्सने १००० लाख यूएस डॉलर्सची तरतूद केली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी