Renault Discount: रेनोच्या विविध कारवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या

भ्रूममभ्रूमम
Updated Jul 10, 2019 | 20:41 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Renault: रेनो त्यांच्या विविध कारवर सवलत देत आहे. आपण या कारवर एक लाख रूपयांपर्यंत बचत करू शकता. हा डिस्काऊंट रेनो क्विड, डस्टर आणि कॅप्चरवर उपलब्ध आहेत.

Renault kwid car
रेनोच्या विविध कारवर जबरदस्त डिस्काऊंट 

थोडं पण कामाचं

  • रेनो डस्टरवर मिळतोय १ लाख रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट
  • रेनो कॅप्चरवर ५५ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट
  • रेनो क्विडवर २५ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट

नवी दिल्ली: सध्या ऑटोमोबाईल उद्योग सर्वात वाईट अवस्थेतून जातोय. ऑटो कंपन्यांची विक्री सतत घटत आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासून ऑटोमोबाईल कंपन्यांची विक्री मागील वर्षापेक्षा कमी झाली आहे. यामुळे, कंपन्यांनी त्यांचे उत्पादन कमी केलं आहे. पण कार डीलर्स जुन्या साठ्यांबद्दल त्रस्त आहेत. फ्रेंच ऑटोमेकर रेनोलाही मार्केटकडून काही खास अपेक्षा नाहीत.

कंपनीनं जुने स्टॉक संपविण्यासाठी सेलचा वापर केला आहे. रेनो डीलर्स विविध कारवर सवलत देत आहेत. कंपनी अनेक नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. त्यामुळे जुन्या मॉडेलची विक्री करणे आवश्यक आहे. चला एक नजर टाकूया रेनोच्या कार - डस्टर, कॅप्चर आणि क्विड वर मिळत असलेल्या डिस्काऊंटवर.

रेनो डस्टर

रेनो डस्टर फेसलिफ्ट अधिकृतपणे संपूर्ण देशात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रेनो डस्टरच्या प्री फेसलिफ्ट व्हर्जनवर सवलत उपलब्ध आहे, या कारची थेट स्पर्धा हुंडई क्रेटा आणि मारूती सुझुकी एस. क्रॉसबरोबर आहे. रेनो या कारवर १.०५ लाख रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे. हा फायदा डिझेल व्हेरिएंटवरही उपलब्ध आहे. त्याच वेळी, पेट्रोल व्हेरिएंटवर ३५ हजार रूपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. रेनो डस्टर १.५ लीटर डिझेल आणि पेट्रोल इंजिनच्या पर्यायावर मिळते. दोन्ही इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सच्या पर्यायाबरोबर येतात.

रेनो कॅप्चर

ही कार स्टायलिश लूकबरोबर येते. जर आपल्याला स्टायलिश डस्टर खरेदी करायची नसेल तर, रेनो कॅप्चर आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. रेनोच्या या कारला अपेक्षेनुसार यश मिळालं नाही. अलीकडेच कंपनीनं या कारमध्ये काही अपडेट केलं आहेत. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. १.५ लीटर पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटसह, कारला मॅन्युअल ट्रांसमिशन मिळते. या कारवर ५५ हजार रूपये डिस्काऊंट आहे.

रेनो क्विड

रेनोची ही कार खूप लोकप्रिय आहे. २०१५ मध्ये लॉन्च झाल्यापासून ही कार लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. नुकतंच या कारने ३० लाख युनिट्सची विक्री केली आहे. रेनोची ही कार लोकांच्या पसंतीस उतरली. ज्यामुळे ही मारूती सुझुकी अल्टोचा पर्याय बनली. ग्राहकांची कार खरेदी करायची पहिली पसंती अल्टो होती, तेव्हा या कारने स्वतःची अशी जागा बनविली.

रेनो क्विड ८०० सीसी १.० लीटर इंजिनसह येते, ज्यात मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅन्डर्ड व्हेरिएंट्स म्हणून उपलब्ध आहे. तसंच, आपल्याला एएमटी व्हेरिएंट हवं असल्यास आपल्याला पेट्रोल इंजिनची मोठी मोटार खरेदी करावी लागेल. या कारवर २५ हजार रुपयांची सूट मिळाली आहे. महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे डिस्काऊंट आहेत. त्यामुळे आपल्या शहराच्या डीलरकडून पहिले अचूक सूट जाणून घेऊन मगच कार विकत घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Renault Discount: रेनोच्या विविध कारवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या Description: Renault: रेनो त्यांच्या विविध कारवर सवलत देत आहे. आपण या कारवर एक लाख रूपयांपर्यंत बचत करू शकता. हा डिस्काऊंट रेनो क्विड, डस्टर आणि कॅप्चरवर उपलब्ध आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola