आली....आली सनरुफवाली Maruti Brezza आली; नव्या अवतारातील मारुती ब्रेझाची जाणून घ्या वैशिष्ट्ये अन् गाडीत काय काय आहे नवं

Maruti Suzuki Vitara Brezza : पुढील काही दिवसात मारुती सुझुकीची ही कॉम्पक्ट एसयूव्ही (Compact SUV)जबरदस्त लूक आणि फीचर्स सोबत लाँच होणार आहे. नवीन ब्रेझामध्ये एसयूव्हीच्या डिझाइनमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत.

Find out the features of Maruti Vitara  Brezza
सनरुफवाली Maruti Vitara Brezza आली, जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नवीन ब्रेझामध्ये एसयूव्हीच्या डिझाइनमध्ये आमूलाग्र बदल
  • मारुती सुझुकी विटारा ब्रेझाचे इंजिन, पॉवर आणि फीचर्समध्ये 1.5 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन असणार
  • या कारची किंमत ७.५ लाख रुपयांपासून सुरू होणार

New Maruti Suzuki Vitara Brezza India Launch:  नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) यावर्षी आपल्या अनेक पॉप्यूलर कारचे नेक्स्ट जनरेशन मॉडल आणणार आहे. यात सर्वात आधी नंबर लागणार आहे, मारुती सुझुकी विटारा ब्रेझाचा (Maruti Suzuki Vitara Brezza ). या कारची (SUV Car) लोकांना सर्वात जास्त उत्सुकता आहे. पुढील काही दिवसात मारुती सुझुकीची ही कॉम्पक्ट एसयूव्ही (Compact SUV)जबरदस्त लूक आणि फीचर्स सोबत लाँच होणार आहे.

नवीन ब्रेझामध्ये एसयूव्हीच्या डिझाइनमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. सध्या ते अंतिम चाचणी टप्प्यात आहे. अलीकडेच, रोड टेस्टदरम्यान कारला स्पॉट करण्यात आले असून या नवीन कारमध्ये काय काय नवीन गोष्टी असणार याची माहिती मिळाली आहे. ज्यात फॅक्ट्री फिटेड सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि ड्युअल टोन कलर अलॉय व्हील्ज सह अनेक फीचर्स मिळणार आहेत. हे वैशिष्ट्ये सध्याच्या ब्रेझा मॉडल मध्ये उपलब्ध नाहीत. 

काय आहे नवं या कारमध्ये

मारुती सुझुकी आपली 2022 मारुती ब्रेझाला अशा लूक आणि फीचर्स सोबत आणण्याची तयारी करीत आहे. ज्यात या सेगमेंटच्या बेस्ट सेलिंग एसयूव्ही टाटा नेक्सॉनच्या ग्राहकांना आकर्षित करू शकतील. नुकतीच या कारची एक इमेज समोर आली आहे. ज्यात खूप नवीन फीचर्स संबंधी माहिती मिळाली आहे. कारच्या फ्रंटमध्ये नवीन ग्रिल सोबत नवीन बंपर, ट्विन पॉड हेडलँम्प्स आणि ए शेप एलईडी डीआरएल पाहायला मिळतील. सोबत नवीन फ्रंट आणि नवीन डिझाइनची ड्युअल टोन अलॉय व्हील पाहायला मिळेल.

इंजिन, पॉवर आणि फीचर्स

2022 मारुती सुझुकी विटारा ब्रेझाचे इंजिन, पॉवर आणि फीचर्समध्ये 1.5 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन असणार आहे. जे 105 एचपीचे पॉवर आणि 138 एनएमचे टॉर्क जनरेट करेल. ब्रेझाचे सध्याचे मॉडल मॅन्यूअल सोबत 4 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत आणले आहे. परंतु, नेक्स्ट जनरेशन ब्रेझामध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स पाहायला मिळू शकते. 

असे असा असेल आतील भाग 

अपकमिंग 2022 मारुती ब्रेझाची संभावित फीचर्समध्ये फॅक्ट्री फिटेड सनरूफ, वायरलेस चार्जिंग सिस्टम, नवीन फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम सोबत ई-सीम कनेक्टिविटी आणि जिओ फेसिंग, रियल टाइम ट्रॅकिंग, फाइंड माय कारचे कनेक्टेडे कार फीचर्स पाहायला मिळू शकतील. या कारची किंमत ७.५ लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी