SUV that save driver and passengers during accident : भारतात कार तयार करणाऱ्या कंपन्यांनी सेफ्टी फीचर्सना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. देशात विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीमध्ये सुरक्षेचे फीचर्स देण्यात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन या कंपन्या आघाडीवर आहेत. सुरक्षेसाठीच्या फीचर्समुळे अपघात झाल्यास एसयूव्ही चालक आणि वाहनात बसलेले इतर प्रवासी सुरक्षित राहण्याची शक्यता वाढली आहे.
भारतीय कार बाजारात विकली जाणारी टाटा मोटर्स कंपनीची टाटा पंच ही वाजवी दरात उपलब्ध असलेली सुरक्षित एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. एबीएस, ईबीडी, ड्युअल एअरबॅग्स, ट्रांन्झॅक्शन कंट्रोल ही फीचर्स या एसयूव्हीमध्ये आहेत. या कारची किंमत सहा लाखांपासून सुरू होते.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची स्कॉर्पियो एन आणि एक्सयूव्ही 700 यात मल्टिपल एअरबॅग, एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर, कॅमेरा ही फीचर्स आहेत. महिंद्राच्या एक्यूव्ही 700 ची किंमत 13.95 लाखांपासून तर स्कॉर्पियो एन ची किंमत 12.74 लाखांपासून सुरू होते.
स्कोडा कुशाकला ग्लोबल एनकॅपने फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग्स दिले आहे. फोक्सवॅगन टायगुन ही पण फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग्स मिळालेली एसयूव्ही आहे. या दोन्ही एसयूव्हीमध्ये मल्टीपल एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, ईएससी, पार्क डिस्टेंस कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा, मल्टी कोलिजन ब्रेक ही सेफ्टी फीचर्स आहे. स्कोडा कुशाकची किंमत 11.59 लाखांपासून सुरू होते. फोक्सवॅगन टायगुनची किंमत 11.56 लाखांपासून सुरू होते.
दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या CNG कार