टाटा Nexon EV लवकरच बाजारात, एकदा चार्ज केल्यास चालणार 300 किलोमीटर 

Tata Nexon EV: टाटा कंपनीने आपली इलेक्ट्रिक नेक्सन कारच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. टाटा कंपनीची ही इलेक्ट्रिक नेक्सन एकदा चार्ज केल्यास 300 किलोमीटर चालण्याचा दावा करण्यात येत आहे.

tata nexon ev ziptron technology 300 km single charge car news
टाटा Nexon EV लवकरच बाजारात, एकदा चार्ज केल्यास चालणार 300 किलोमीटर  

थोडं पण कामाचं

  • Tata Nexon EV ही कार 2019-20 च्या शेवटी होणार लॉन्च
  • ही कार एकदा चार्ज केल्यास 300 किलोमीटर चालणार
  • या कारची किंमत 15 ते 17 लाख रुपये असण्याचा अंदाज

मुंबई: देशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने नुकतीच आपल्या इलेक्ट्रिक नेक्सन कारच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. झिपट्रॉन टेक्नोलॉजीसोबत टाटा मोटर्स आपली नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करणार आहे. या कारची किंमत 15 ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहे. कंपनीने दावा केला आहे की टाटा नेक्सन ईव्ही ही कार एकदा चार्ज केल्यास 300 किलोमीटर चालणार आहे.

झिपट्रॉन टेक्नोलॉजीसोबत तयार करण्यात येत असलेली नेक्सन ईव्ही या कारमध्ये हायव्होल्टेज सिस्टम उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये फास्ट चार्जिंग फिचर, बॅटरी आणि मोटरची 8 वर्षांची वॉरंटी असणार आहे. सोबतच कारमध्ये आयपी 67 स्टँडर्ड रेटिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे.

टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझनेस आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटर्जीचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, "आम्हाला ही घोषणा करताना खूपच आनंद होत आहे की, टाटा नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) ही कार आर्थिक वर्ष 2019-20 च्या शेवटच्या तिमाहीत लॉन्च करण्यात येईल. या कारमध्ये झिपट्रॉन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. नेक्सन ईव्ही या कारमध्ये थ्रिलिंग रोड परफॉर्मंस आणि झिरो इमिशिन मिळेल."

कंपनीतर्फे या कारसाठी #TheUltimateElectricDrive असं कॅम्पेन सुद्धा सुरु केलं आहे. कंपनीच्या मते, नेक्सन ईव्ही कारमधील मुख्य फिचर्सला फोकस करण्यासाठी हे कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे. ही कार एकदा पूर्णपणे चार्ज केल्यास जवळपास 300 किलोमीटर चालवता येऊ शकते असं कंपनीने सांगितलं आहे. टाटा नेक्सन ईव्ही ही कार उत्तम आणि कनेक्टेड ड्राइव्ह करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करेल असंही कंपनीने म्हटलंय.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...